‘आरटीओ’कडून २२० बसची तपासणी; शाळा आणि पालकांनीही खबरदारी घेण्याचे आवाहन
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
राज्य शासनाने लागू केलेल्या शाळाबस नियमावलीनुसार नसणाऱ्या विद्यार्थी वाहतुकीतील वाहनांवर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) कारवाईचा बडगा उगारला आहे. शुक्रवारी दिवसभरात आरटीओच्या पथकाने २२० स्कूल बसची तपासणी केली. त्यात अनेक बस नियमबाह्य आणि असुरक्षितपणे विद्यार्थ्यांची वाहतूक करत असल्याचे समोर आले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत वाहतूकदारांसह शाळा आणि पालकांनीही खबरदारी घेणे आवश्यक असल्याचे आवाहन आरटीओने केले आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीच्या दृष्टीने राज्य शासनाने शाळाबसबाबत व विद्यार्थी वाहतुकीच्या प्रक्रियेबाबत काटेकोर नियम घालून दिले आहेत. प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांची वाहतूक नियमावलीनुसार होते की नाही, यावर लक्ष ठेवण्यासाठी शालेय समित्यांची स्थापना केली आहे. मात्र, अद्यापही अनेक ठिकाणी नियमावलीनुसार नसणाऱ्या वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे आरटीओकडून संबंधित वाहनांवर धडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे.
शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी परवाना नसणे, शाळाबसचे योग्यता प्रमाणपत्र मुदतीत नसणे, नियमावलीनुसार स्कूल बस नसणे, खासगी वाहनांतून विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, रिक्षा, व्हॅन आदींसारख्या वाहनांतून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक करणे, अशा प्रकारच्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी आरटीओकडून मोहीम राब्विण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक प्रादेशिक अधिकारी स्नेहा मेढे यांच्या पथकोने ही मोहीम राबविली. शहरातील रस्त्यांवर १४ पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी २२० वाहनांची तपासणी केली. त्यातील ५९ वाहने दोषी आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. त्यापैकी २४ वाहने अटकावून ठेवली असून, त्यात १७ खासगी वाहने आणि सात शालेय वाहनांचा समावेश आहे. नियमावलीचे पालन न करणाऱ्या वाहनांचा परवाना निलंबन, नोंदणी क्रमांक रद्द करण्याची कारवाई करणार असल्याचे आरटीओकडून स्पष्ट करण्यात आले.
‘पालकांची जागरूकता महत्त्वाची’
पाल्य वाहनांतून सुरक्षितपणे शाळेत जातो की नाही, हे पाहण्याची जबाबदारी पालकांचीही आहे. त्यांनी याबाबत जागरुकता ठेवणे आवश्यक असल्याचे मत प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी यांनी व्यक्त केले. नियमावलीनुसार प्रत्येक शाळेत शालेय समिती असून, त्यात शाळेचे प्रशासन, वाहतूकदार, वाहतूक पोलीस आणि पालक प्रतिनिधी आहेत. शाळेचे शुल्क आणि नियमांसह सर्व बाबी पालकांना माहीत असतात, मग शाळाबसच्या सुरक्षिततेबाबत पालक दुर्लक्ष का करतात. शाळा किंवा वाहतूकदार सहकार्य करत नसेल किंवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीबाबत काही अडचणी असल्यास पालकांनी आमच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आजरी यांनी केले.