पुणे : राज्यात झिकाचा धोका वाढला असून, एकूण रुग्णसंख्या ८० वर पोहोचली आहे. राज्यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक ७३ रुग्ण आढळले आहेत. पुण्यात झिकाची रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत असताना इतर जिल्ह्यांत झिकाच्या रुग्णसंख्येत फारशी वाढ नोंदविण्यात आलेली नाही. झिकाचा धोका गर्भवती आणि तिच्या गर्भाला अधिक असल्याने त्यांच्या तपासणीवर आरोग्य विभागाने भर दिला आहे. त्यामुळे एकूण रुग्णांमध्ये गर्भवतींचे प्रमाण जास्त आहे.

राज्यात ६ ऑगस्टपर्यंत झिकाचे एकूण ८० रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात झिकाचा पहिला रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यात मेमध्ये आढळून आला आणि त्याच महिन्यात संगमनेरमध्ये दुसरा रुग्ण आढळला. पुण्यात जून महिन्यात झिकाचा शिरकाव झाला. पुणे शहरातील झिकाची रुग्णसंख्या ६६ वर पोहोचली आहे. पुण्यातील ग्रामीण भागात ५ आणि पिंपरी-चिंचवडमध्ये २ रुग्ण आढळले असून, पुणे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ७३वर पोहोचली आहे.

Heavy rain Maharashtra, agricultural Maharashtra,
आठवडाभर राज्यात सर्वदूर दमदार सरी? ऐन सुगीत शेतीमाल मातीमोल होणार?
What is beef tallow and how is it made_
Tirupati laddoo: तिरुपतीच्या लाडवाच्या निमित्ताने चर्चेत आलेले बीफ…
Ganesha, rain, rain forecast, rain maharashtra,
पावसाच्या सरींमध्ये गणरायाचे आगमन? जाणून घ्या, राज्यभरातील शनिवारचा पावसाचा अंदाज
16 districts of the state are anemic malnourished
राज्यातील १६ जिल्हे ऍनिमिया कुपोषित, मात्र ‘या’ २२ गावांची वाटचाल मुक्ततेकडे…
maharashtra recorded 29 percent more rainfall than average
Rainfall In Maharashtra : राज्यात २९ टक्के अधिक पाऊस; जाणून घ्या, कोणत्या जिल्ह्यांत किती पाऊस पडला
heavy rain in Dharashiv district,
धाराशिव जिल्ह्याला पावसाने झोडपले; रस्ते पाण्याखाली, तेरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Nirbhaya Squad, Maharashtra, women’s safety, Nirbhaya Squads in Maharashtra Remain Largely Inactive, police commissionerates, Nagpur,
राज्यातील निर्भया पथक कागदावरच!
rain Pune, Pune rain news, Pune weather,
पुण्यात सरींवर सरी

हेही वाचा >>>pune crime news:दागिने घडविण्यासाठी दिलेले ४२ लाखांचे सोने चोरून कारागीर पसार

झिकाचा धोका गर्भवती आणि तिच्या गर्भाला अधिक असतो. त्यामुळे गर्भवतींच्या तपासणीवर भर दिला जात आहे. पुणे महापालिकेने रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील ६२५ गर्भवतींचे रक्तनमुने आतापर्यंत तपासणीसाठी राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविले. पुणे जिल्हा परिषदेने ४६२ गर्भवतींचे नमुने आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने १० गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविले आहेत. त्याचबरोबर कोल्हापूर ४०, संगमनेर १७१, मिरज १६ आणि सोलापूरमधील ४ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण १ हजार ३२८ गर्भवतींचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहिती आरोग्य सहसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांनी दिली.

हेही वाचा >>>पुणे: प्रेमीयुगुलाला ब्लॅकमेल करणारा पोलीस कर्मचारी निलंबित

चार रुग्णांच्या मृत्यूचे परीक्षण

पुणे शहरात झिकाचे ६६ रुग्ण आढळले असून, त्यातील २६ गर्भवती आहेत. याचबरोबर झिकाच्या ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले रुग्ण सहव्याधिग्रस्त होते. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण शोधण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाची समिती मृत्यू परीक्षण करणार आहे. त्यातून त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी सांगितले.

झिका विषाणूच्या संसर्गामुळे गर्भावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे मूल जन्मजात विकृतीसह जन्माला येऊ शकते. हा संसर्ग मुदतपूर्व जन्म आणि इतर गुंतागुंतीसाठीही कारणीभूत ठरतो. गर्भवतीला झिकाचा संसर्ग झाल्यास गर्भाच्या डोक्याचा आकार कमी राहतो. याला गुलियन बॅरी सिंड्रोम म्हणतात. हा एक दुर्मीळ मेंदुविकार असून, त्यात शरीरातील रोगप्रतिकारक यंत्रणा मज्जासंस्थेच्या भागावर हल्ला करते.- डॉ. महेंद्र जगताप, राज्य कीटकशास्त्रज्ञ