पुणे : मोठा गाजावाजा करून राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून बारामतीत आयोजित केलेल्या दोन दिवसीय नमो महारोजगार मेळाव्याकडे बेरोजगारांनी पाठ फिरवल्याचे स्पष्ट झाले आहे. या मेळाव्यात ५५ हजार जणांना रोजगार देण्याचे लक्ष्य होते, मात्र दोन दिवसांत केवळ १२ हजार ५०० जणांनाच रोजगार मिळाला. 

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्या वतीने २ आणि ३ मार्च रोजी हा ‘नमो महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. तथापि, या मेळाव्याला यथातथाच प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले.

All about the Indian Forest Service
नोकरीची संधी
मुख्यमंत्रीपद नाही आणि महत्त्वाचं गृहखातंही नाही यामुळे शिंदेंच्या नाराजीत भरच पडली. (फोटो सौजन्य पीटीआय)
Maharashtra Politics : नाराज एकनाथ शिंदे भाजपासाठी अडचणीचे?
Contractual electricity meter readers protest splits
कंत्राटी वीज मीटर वाचकांच्या आंदोलनात फूट! नागपूरसह काही जिल्ह्यात…
supreme court recruitment 2025 news in marathi
नोकरीची संधी : सर्वोच्च न्यायालयात भरती
Central Bank of India Credit Officer Recruitment 2025:
बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी; १ हजार जागांसाठी होतेय भरती; कसा करायचा अर्ज? जाणून घ्या
job opportunity in indian oil corporation and clerk recruitment in mumbai high court
नोकरीची संधी: इंडियन ऑईल कॉर्पोरेशनमध्ये संधी
IT Company, IT , IT Company Jobs,
‘आयटी’तील बेरोजगारांचे लोंढे अन् त्यामागील अमानवीय चेहरा…
Life in an IIT | Accessible buildings, transformative experience: Here’s journey of Pune boy to IIT Bombay
‘हारा वही, जो लड़ा नही’ पुण्याच्या दिव्यांग तरुणाचा आयआयटी बॉम्बेपर्यंतचा प्रवास ऐकून थक्क व्हाल

हेही वाचा >>> पिंपरी: थकबाकीदारांना आता ‘अभय’ नाही, महापालिकेने दिला ‘हा’ इशारा

या मेळाव्याच्या निमंत्रणावरून वाद झाला होता. मेळाव्यात सहभागी झालेल्या काही कंपन्यांची माहितीही ‘इंटरनेट’वर नसल्याची तसेच काही कंपन्यांच्या नावाशी साधर्म्य असलेली वेगळीच कंपनी आढळते. त्यामुळे बेरोजगारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.  रिक्त जागांवर बेरोजगारांना प्रत्यक्ष नोकऱ्यांऐवजी प्रशिक्षणार्थी (ट्रेनी) पदे भरली जाणार आहेत.

मेळाव्याला २२,०४८ उमेदवारांनीच हजेरी लावली आणि अवघ्या साडेबारा हजार तरुणांना नोकरी मिळाली. ५५ हजार रोजगार देण्याचे लक्ष्य गाठता आले नाही..

मेळाव्यातील जागांचा तक्ता पाहिला, तर त्यातील  जवळपास ३० हजार जागा या नोकऱ्या नसून प्रशिक्षणार्थी पदे आहेत. त्यामुळे या रोजगार मेळाव्यावर माहिती अधिकार कार्यकर्ते आणि आम आदमी पक्षाचे महाराष्ट्र उपाध्यक्ष विजय कुंभार यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

या मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा हे उपस्थित राहिले होते. या मेळाव्यातून ५५ हजार जणांना रोजगार देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत होते. मेळाव्यासाठी ३४५ कंपन्यांनी आपल्या रिक्त जागा कळविल्या होत्या. पहिल्या दिवशी १६४, तर दुसऱ्या दिवशी ५८ कंपन्यांनी मेळाव्याला उपस्थिती लावली होती.

विभागीय आयुक्तांची कबुली

केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या समाजकल्याण विभागाच्या विविध योजनांचा लाभ देण्याचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले, ‘‘नमो महारोजगार मेळाव्यात ५५ हजार नोकऱ्या उपलब्ध होत्या, मात्र तेवढे उमेदवार आले नाहीत. त्यामुळे साडेबारा हजार जणांना या मेळाव्यातून नोकरी मिळाली.’’

Story img Loader