पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर दापोडी येथील हॅरिस पूल ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंतच्या मार्गावर ‘अर्बन स्ट्रीट डिझाइन’नुसार एकसमान रचनेचे पदपथ तयार करण्यात येणार आहेत. रस्त्यांची रुंदी कमी न करता आणि एकही झाड न तोडता पदपथ सुशोभित केले जाणार असल्याने या मार्गाचा कायापालट होईल, असा दावा महापालिकेने केला आहे.

पहिल्या टप्प्यात हॅरिस पूल ते पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक या दोन्ही बाजूच्या सेवा मार्गावर अर्बन स्ट्रीट डिझाइनचे काम केले जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पिंपरीतील डॉ. आंबेडकर पुतळा चौक ते निगडीच्या भक्ती-शक्ती समूहशिल्प चौकापर्यंतचे काम केले जाणार आहे. स्थापत्य व विद्युत विभाग हे काम एकाच वेळी एकत्रित पद्धतीने करणार आहेत.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हेही वाचा…माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांचा जीवनगौरव

महापालिकेने घरे आणि दुकाने तोडून दापोडी ते निगडी हा १२.५० किलोमीटर अंतराचा समतल विलगक (ग्रेड सेपरेटर) तयार केला. त्यानंतर १५ वर्षांनी पदपथ, सायकल ट्रॅक व सुशोभीकरणासाठी या रस्त्यावर १७० कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एकसमान पदपथ आणि सुशोभीकरणामुळे या मुख्य मार्गावरून ये-जा करताना वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा सुखद अनुभव मिळेल, असा दावा महापालिकेने केला आहे.

सायकल मार्ग

भित्तिचित्रे व आकर्षक चित्रे लावून परिसर सुशोभित केला जाणार आहे. या मार्गावर व्यायामाचे साहित्य ठेवले जाणार आहे. एकसमान आकाराचे एलईडी दिव्यांचे विद्युत खांब उभारण्यात येणार आहेत. रस्त्यांवर लाल रंगाचे पट्टे मारून सायकल मार्ग बनविला जाणार आहे.

हेही वाचा…समता, न्याय मिळण्याच्या दिशेने कायद्यांमध्ये बदल होणे गरजेचे, मेधा पाटकर यांचे मत

वाहतूककोंडी

दापोडी ते निगडी हा १२.५० किलोमीटर अंतराचा आठ पदरी रस्ता २००४ ते २००८ या काळात तयार करण्यात आला. रस्ता करताना महापालिकेस प्रचंड विरोध सहन करावा लागला. इतक्या मोठ्या रुंदीच्या रस्त्याची आवश्यकता का आहे, असे प्रश्न त्या वेळी केले गेले होते. या मार्गावर बीआरटी सेवा सुरू आहे. आता मेट्रो मार्गिका, अर्बन स्ट्रीट डिझाइनचे काम सुरू आहे. त्यामुळे रस्ता अरुंद झाला असून, वाहतूककोंडीत भर पडत आहे.

दापोडी ते निगडी मार्गावरील प्रत्येक चौकात रस्ता ओलांडण्याची सुविधा असणार आहे. सायकल मार्गामुळे सायकल चालविण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. एकसमान आकाराचे पदपथ आणि सुशोभीकरण केल्याने रस्त्याच्या सौंदर्यात भर पडणार असल्याचे मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे यांनी सांगितले.

Story img Loader