कृषी क्षेत्रात वेगाने बदल घडत आहेत. जागतिक स्पर्धेत टिकण्यासाठी आणि जागतिक बाजारात देशात उत्पादित होणाऱ्या फळांचा वाटा वाढविण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून मूल्यसाखळीचा विकास करावा लागणार आहे, त्यासाठी सामूहिक प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी केले.

हेही वाचा >>>पुणे : देशात सर्वाधिक वखार केद्रांची नोंदणी ; राज्य वखार महामंडळ अव्वल

Ration Distribution delayed due to technical difficulties Nagpur news
 ‘सर्व्हर डाऊन’ ! राज्यात स्वस्त धान्य वाटप रखडले…
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
issue of ministery post between Devendra Fadnavis Eknath Shinde and Ajit Pawar is likely to be resolved in Delhi
खातेवाटपाचा पेच आता दिल्लीतच सुटण्याची शक्यता
43 ministers maharashtra
विश्लेषण : महाराष्ट्रात ४३ मंत्रीच? मंत्रिमंडळात मंत्र्यांची संख्या किती असते? या संख्येवर बंधने का असतात?
Sugarcane Cultivation Kolhapur , Sugarcane ,
लोकशिवार… मुरमाड जमिनीतील उसाची दमदार लागवड
sunk deposits loksatta news
विश्लेषण : बुडालेल्या ठेवी परत मिळू शकतात? शासनाचे नवे परिपत्रक काय?
After soybeans price of cotton become big issue for farmers in Vidarbha
विदर्भात कापसाचे अर्थकारण विस्‍कळीत
loksatta readers response loksatta news
लोकमानस : सत्यकथनासाठी निवृत्तीचा मुहूर्त

वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत ‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ. अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे कृषी आयुक्त धीरज कुमार आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>>पुणे : अनैतिक संबंधातून पतीचा खून ; पत्नीसह चौघे गजाआड

तोमर म्हणाले, ‘ॲग्री स्टार्टअप, पीकविमा, बाजारपेठेची उपलब्धता आदींद्वारे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न दुप्पट करण्याचे प्रयत्न होत आहेत. तरुणांनी नव्या तंत्राचा वापर शेतीत करावा. शेतीत वेगाने बदल घडत असल्याने आणि सरकारकडून आश्वासक प्रयत्न सुरू असल्यामुळे नवी पिढी शेतीकडे आकर्षित होत आहे. देश अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे. इतर शेती उत्पादनातही आघाडीवर आहे. देशाला फुलशेती, फलोत्पादन आणि भाजीपाला उत्पादनाच्या क्षेत्रातही चांगली संधी आहे. केंद्र सरकार समूह विकास कार्यक्रम, शेतकरी उत्पादक संघ (एफपीओ), फलोत्पादन मिशनद्वारे लहान शेतकऱ्यांना एकत्रितपणे काम करण्यासाठी आणि उत्तम गुणवत्तेचे उत्पादन करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. ग्रामीण क्षेत्र देशाचा आत्मा आहे. शहरासोबत देशातील ग्रामीण भाग स्वच्छ आणि संपन्न होणे गरजेचे आहे. गाव स्वावलंबी झाल्यास देश स्वावलंबी होईल.’

हेही वाचा >>>रुपी अवसायनात ; अवसायक म्हणून धनंजय डोईफोडे यांची नियुक्ती

केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन यांनी फलोत्पादनाबाबत देशातील सद्य:स्थिती आणि आव्हानांविषयी माहिती दिली. तोमर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते ‘ऑरगॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर हॉर्टीकल्चर क्रॉप्स’ आणि ‘मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन’ या पुस्तिकांचेे; तसेच फलोत्पादन क्षेत्रातील यशकथांच्या संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.

Story img Loader