पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डेक्कन कॉलेज येथे विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी एका विद्यार्थिनीने तुम्ही इतक्या कणखर कशा झालात, असा प्रश्न  विचारला. स्मितहास्य करून सीतारामन यांनी बेटा, हा प्रश्न कसा सुचला? खूप अवघड प्रश्न विचारलास. प्रत्येक स्त्री ही कणखरच असते. तिच्यातील क्षमता योग्य वेळी ती दाखवतेच, असे उत्तर दिले.  सीतारामन यांच्या या उत्तरानंतर सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. डेक्कन कॉलेज पोस्ट ग्रॅज्युएट अँड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे ‘विकसित भारताची संकल्पना साकार करण्यात उच्च शिक्षणाची भूमिका’ या विषयावर निर्मला सीतारामन यांचे व्याख्यान झाले. त्या प्रसंगी त्या बोलत होत्या. उपकुलगुरू प्रा. प्रमोद पांडे यांनी प्रास्ताविक केले.

हेही वाचा >>> विदर्भ, मराठवाड्यात उष्णतेच्या झळा, पुढील आठवड्यात पावसाचा इशारा

Success Story Of Aditya Srivastava In Marathi
Success Story Of Aditya Srivastava: स्वप्ने सत्यात उतरतात! लाखोंची नोकरी सोडून यूपीएससी परीक्षेत आला पहिला, वाचा अनेकांची प्रेरणा ठरणाऱ्या आदित्य श्रीवास्तवचा प्रवास
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
maori leader protest in newzealand
विधेयकाचा निषेध म्हणून महिला खासदाराचा ‘वॉर डान्स’; कुठल्या देशाच्या संसदेत घडला हा प्रकार?
eradication of caste book review
बुकमार्क : जातीय जनगणना की जातिव्यवस्थेचे निर्मूलन?
Milind Gawali
“या पाच वर्षांत…”, ‘आई कुठे काय करते’मधील भूमिकेबद्दल मिलिंद गवळींचे मोठे वक्तव्य; म्हणाले, “अनिरुद्धला…”
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र :  राज्य सेवा मुख्य परीक्षा – मानवी हक्क विकासात्मक मुद्दे
Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : “त्यांनी मला आयुष्यातून उठवण्याचा प्रयत्न केला, पण…”, चांदीवालांच्या गौप्यस्फोटावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सीतारामन म्हणाल्या, की रोहित वेमुलाची आत्महत्या ही एक दुर्दैवी आणि आकस्मिक घटना होती. पण, विरोधकांनी जाणीवपूर्वक तो दलित असल्याचा अपप्रचार केला. विशिष्ट हेतू ठेवून केंद्र सरकार दलितविरोधी असल्याचे चित्र निर्माण केले गेले. देशभरात आंदोलन केले गेले. देशासमोर खोटे चित्र उभे करण्यात आले. राहुल गांधींनी संसदेत हा मुद्दा उपस्थित केला. पण, काँग्रेसची सत्ता असलेल्या तेलंगणा राज्याच्या पोलिसांनी रोहित दलित नव्हता, असे सांगून या प्रकरणाचा तपास बंद केला आहे. त्यामुळे दिशाभूल केल्याप्रकरणी काँग्रेससह विरोधी पक्षांनी देशाची आणि रोहितच्या कुटुंबाची माफी मागायला हवी. देशातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये एक अजेंडा ठरवून संशोधन केले जात नाही.

हेही वाचा >>> पौड रस्त्यावर थरार, भरधाव पीएमपीची तीन वाहनांना धडक

सर्व उच्च शिक्षण संस्थांमध्ये संशोधनाच्या निकषांनुसारच संशोधन सुरू आहे, असा निर्वाळा निर्मला सीतारामन यांनी दिला. अजेंडा ठरवून संशोधन केले जात असल्याचा अपप्रचार सुरू आहे. नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर उच्च शिक्षणावरील खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे परदेशात जाण्याचे आणि तिथेच स्थायिक होण्याचे प्रमाण घटले आहे. नवे शैक्षणिक धोरण भारतात क्रांती घडवेल. शिक्षणात लवचिकता येईल. विद्यार्थ्यांना क्रेडिट बँक उपलब्ध होईल. मुख्य शिक्षणासोबत आवडीच्या अन्य विषयांचाही अभ्यास करता येईल. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे सर्व प्रकारचे उच्च शिक्षण मातृभाषेतून उपलब्ध होईल. इंग्रजी भाषेच्या दडपणामुळे उच्च अथवा तंत्रशिक्षणापासून दूर राहिलेल्यांना दर्जेदार उच्च शिक्षण उपलब्ध होईल, असेही सीतारामन यांनी सांगितले.