भाजपाचे नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौर्‍यावर असणार आहेत. या दोन दिवसांदरम्यान ते अनेक कार्यक्रमांना उपस्थित राहतील. त्यामध्ये प्रामुख्याने आंबेगाव बुद्रुक येथील शिवसृष्टी लोकार्पण सोहळा याचा समावेश आहे. तसेच, भाजपाचे खासदार गिरीश बापट यांची ते भेट घेणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अमित शाह १८ तारखेला काश्मीरमध्ये शहीद झालेल्या पोलिसांच्या मुलींसोबत ‘जे डब्ल्यू मेरीयेट’ येथे संवाद साधतील. त्यानंतर मोदी @ २० पुस्तक प्रकाशन सोहोळ्यास उपस्थित राहणार असून, हा कार्यक्रम झाल्यावर ओंकारेश्वर मंदिरात जाऊन ते दर्शन घेणार आहेत. तर रात्री ९.२५ वाजता खासदार गिरीश बापट यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणार आहेत.

हेही वाचा – पुणे: दहावी-बारावीच्या परीक्षार्थींना दहा मिनिटांचा वाढीव वेळ

हेही वाचा – पुणे: आपचे कार्यकारी अध्यक्ष बेंद्रे निलंबित

दुसर्‍या दिवशी म्हणजेच, १९ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता आंबेगाव येथील शिवसृष्टीचा लोकार्पण सोहळा अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम झाल्यानंतर अमित शाह हे कोल्हापूरला जाणार आहेत.