पुणे : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ संघटनात्मक दौऱ्यानिमित्त रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात गेले असताना त्यांच्या सुरक्षेसाठीच्या  बंदोबस्तात मोहोळ यांना तालिमितील जुना मित्र भेटला. मोहोळ यांनी ताफा थांबवून या जुन्या मित्राची भेट घेतली. कोल्हापूर पोलीस दलात कर्तव्यास असणारे आणि  कोल्हापूरच्या तालमीतील मित्र शहाजी पाटील मोहोळ यांच्या अचानक समोर आले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मित्र शहाजी दिसताच मोहोळ यांनी ताफा थांबवत त्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.इतक्या वर्षांनी अचानकपणे झालेली ही भेट मोहोळ यांच्यासाठी सुखद धक्का देणारी ठरली. मित्राला पाहाताक्षणी तालमीत असतानाच्या आठवणींचा पट मोहोळ यांच्या क्षणार्धात डोळ्यासमोर उभा राहीला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister muralidhar mohol friend visit in kolhapur pune print news apk 13 amy