पुणे : फिकी महिला आघाडी मार्फत राष्ट्रीय प्रदर्शन आणि परिषदेचे उदघाटन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते झाले. केंद्रीय मंत्री नारायण राणे माध्यमांशी संवाद साधला आणि दुष्काळ तसेच उद्धव ठाकरे यांचा औरंगाबाद दौरा आणि राज्यातून बाहेर गेलेले प्रकल्प, अशा विविध मुद्द्यांवर भाष्य केले. तसेच अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शेतकर्‍यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करावा आणि मदत करावी अशी मागणी विरोधक करीत आहेत. ओला दुष्काळ जाहीर न करता देखील आज आम्ही मदत करीत आहोत. ओला दुष्काळ जाहीर करण्यास केंद्र आणि राज्य सरकारचे काही नियम असतात. हेच ‘उद्धव ठाकरे निवडणुकीपूर्वी ५० हजार रुपये इतकी मदत शेतकर्‍यांना मिळाली पाहिजेअशी मागणी करीत होते. ते अडीच वर्ष मुख्यमंत्री असताना त्यांनी शेतकर्‍यांना एकदा तरी मदत केली का ? ते एकदा तरी शेतकर्‍याच्या बांधावर गेले का ? औरंगाबाद येथे उद्धव ठाकरे गेले आणि तिथे ते किती तास होते तर केवळ २६ मिनिटे होते.अडीच वर्षात कधी मातोश्री बाहेर न पडलेल्या मुख्यमंत्र्यांनी टीका करण्याच बंद करावं’ असा टोला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हेही वाचा : क्रिकेटपटू अजिंक्य रहाणे करणार कृषी तंत्रज्ञान नवउद्यमींमध्ये गुंतवणूक

देशात १९२७ पासून फिकी उद्योग व्यवसायात काम करीत आहे. आपल्या देशात नवनवीन तंत्रज्ञान याव यासाठी फिकी काम करीत आहे.त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात महिला उद्योजकांच्या दृष्टीने फिकीने कार्यक्रम आयोजित केला. त्यातून अनेक महिल उद्योजक पुढे येण्यास मदत होईल. विरोधक सातत्याने राज्यात उद्योगासाठी पोषक वातावरण नसल्याने अनेक उद्योग बाहेर जात आहे अशी टीका करत आहेत. राजकीय दृष्टीकोनातून ही टीका केली जात आहे. कालपर्यंत हे सत्तेवर होते असताना राज्यात उद्योग आणू शकले नाहीत आणि ते आता आमच्यावर टीका करीत आहे. त्यांच्या हातून काही झाले नाही. ‘आता आम्ही राज्यात नवीन उद्योग आणू आणि बेरोजगारी कमी करू. तसेच जयंत पाटील यांचा अभ्यास कमी असून नारायण राणेंवर बोलताना अभ्यास करून बोलावे. राज्यातील कोणतेही उद्योग हे बाहेर गेले नसून नोटबंदीमुळे उद्योग येण्यास कोणतीही बंधने निर्माण झाली नाहीत’ असेही राणे म्हणाले.

हेही वाचा : पिंपरीत ‘हर हर महादेव’ चित्रपटाचा शो बंद पाडल्याबद्दल संभाजी ब्रिगेडच्या शहराध्यक्षांसह १३ जणांवर गुन्हा दाखल

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या मनुस्मृतीच्या मुद्द्यावर आणि अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त विधानावर भाष्य करणे टाळले. ‘हर हर महादेव चित्रपटावरून प्रश्न विचारला असता त्यांनी मी मनोरंजनाचा विषय हाताळत नाही. मी सध्या उद्योग द्यायला निघालो आहे. उद्योग,रोजगार, देशाच्या प्रगती बद्दल विचारा त्यावर मी बोलू शकेन’ असे राणे म्हणाले. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा जिथे जिथे जात आहे. त्या ठिकाणी काँग्रेस तोडो सुरू असून तेथील नेते दुसर्‍या पक्षात जात आहे अशी टीका राणेंनी केली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Union minister narayan rane criticism of wet drought uddhav thackeray visit to aurangabad inauguration fcci pune tmb 01 svk
Show comments