पिंपरी : शिरूर लोकसभा मतदारसंघात चार केंद्रीय मंत्री येऊन गेले. मी पाचवा मंत्री आहे. पण, जोपर्यंत सरकारची कामे सातत्याने जनतेला सांगणार नाही. तोपर्यंत कितीही मंत्री मतदारसंघात येऊ द्या काही होणार नाही. त्यामुळे घराघरात जाऊन पत्रके देऊन भाजपाच्या सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवावीत, असे आवाहन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदार संघात ‘मोदी@९ महा- जनसंपर्क अभियान’ सुरू आहे. या निमित्ताने भाजपातर्फे आळंदीत सभा झाली. शिरूरचे निवडणूक प्रमुख महेश लांडगे, माजी आमदार योगेश टिळेकर, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे,आळंदीच्या माजी नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, विकास डोळस आदी उपस्थित होते.

Ajit Pawar claimed area honorables deprived Kharadi Chandannagar of water for tanker business
अन्यथा मते मागायला येणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार का म्हणाले !
d y chandrachud on sanjay raut
D. Y. Chandrachud : संजय राऊतांच्या टीकेवर माजी…
Yogi Adityanath who made the statement Batenge to Katenge now has a different slogan Pune news
‘बटेंगे तो कटेंगे’ असे वक्तव्य करणारे याेगी आदित्यनाथ यांचा आता ‘हा’ नारा
Devendra Fadnavis, Mahesh Landge,
“महेश लांडगे यांचा कुणी बालही बाका करू शकत नाही”, असं देवेंद्र फडणवीस का म्हणाले?
minister chandrakant patil opinion on next cm in the loksatta loksamvad program
मुख्यमंत्री कोण, याचा अंदाज बांधणे अशक्य; मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मत
Revanth Reddy : “ते भारताचे पंतप्रधान आहेत, पण…”; तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांची नरेंद्र मोदींवर गंभीर टीका!
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच

हेही वाचा – समाविष्ट गावांतील पाणी प्रश्न सुटणार?… ‘या’ ठिकाणी होणार पाणीपुरवठा योजना

रावसाहेब दानवे म्हणाले, गेले महिनाभर मंत्री, खासदार, आमदारांना केंद्र सरकारची कामगिरी पोहोचविण्याचे काम दिले आहे. महिनाभर सर्व मंत्री लोकांपर्यंत जात आहेत. भाजपामध्ये केंद्रातून कार्यक्रम येतात. त्याची राज्यातील लोकांना अंमलबजावणी करावी लागते. शिरूरमध्ये पाच केंद्रीय मंत्री येऊन गेले आहेत. आपल्या देशाची मान, शान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे जगाच्या पाठीवर उंचाविली आहे. हे लोकांना सांगावे. २०२४ मध्ये पुन्हा मोदी यांना पंतप्रधान करायचे आहे. त्यासाठी शिरूर लोकसभेचा खासदार भाजपा-शिवसेना युतीचा निवडून द्या असे आवाहनही त्यांनी केले.