पुणे : अपघाताने सायकलिंग करण्याची सवय लागलेल्या पुण्यातील अभियांत्रिकी शाखेचा पदवीधर आणि शिक्षक किरीट कोकजेला या सवयीने आंतरराष्ट्रीय किर्तीचा सायकलपटू म्हणून लौकिक मिळविला आहे.

आयर्नमॅन या साहसी क्रीडा प्रकाराप्रमाणे हा केवळ सायकलिंगमधील एक साहसी क्रीडा प्रकार म्हणून नावारुपाला येत आहे. पॅरिस-ब्रेस्ट-पॅरिस या शारीरिक आणि मानसिक कसोटी पाहणाऱ्या सायकल प्रवासाला पुनरुज्जीवित करणाऱ्या रॉबर्ट लेपरटेल यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार लेस रॅनडोनियर मॉण्डीऑक्स संस्थेमार्फत दिला जातो. सलग चार कॅलेंडर वर्षात लांबपल्ल्याचे सायकलिंग करणारा किंवा सलग ९० तास १२०० कि.मी. सायकलिंग करणारा सायकलपटू या पुरस्कारासाठी पात्र ठरतो. यातही किमान दोन सायकल प्रवास हे परदेशात पार पडणे आवश्यक असतात.

D Gukesh How Much Prize Money Did Indian Grandmaster Win After Winning World Chess Championship
D Gukesh Prize Money: करोडपती झाला विश्विविजेता गुकेश, जागतिक बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर किती मिळाली बक्षिसाची रक्कम?
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
NEET Postgraduate Exam Schedule Announced Wardha news
नीट पदव्युत्तर परीक्षेचे वेळापत्रक जाहीर; वैद्यक आयोग म्हणतो…
Time Moves Faster on the Moon Than on Earth
चंद्र पृथ्वीपेक्षा अधिक वेगवान?; नवीन संशोधनाने उलगडले वेळेचे रहस्य!
hitendra thakur slams bjp for marathon
मॅरेथॉन घेण्याची ताकद आहे का? राजकारण करणार्‍या भाजपला हितेंद्र ठाकूरांचा सवाल
Kalidas hirve , Vasai National Marathon Competition,
वसईत रंगली राष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा, साताऱ्याचा कालिदास हिरवे विजेता
india hyperloop track ready
मुंबई-पुणे फक्त २५ मिनिटांत; पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार, याचा भारताला फायदा कसा होणार?
भूगोलाचा इतिहास : प्रतिभेचा कालजयी आविष्कार – आर्यभटीय

किरीटने २०२० ते २०२३ या कालावधीत लंडन-एडिनबर्ग-लंडन हे १५०० कि.मी. अंतर १२५ तासांत पूर्ण केले. किरीटच्या याच कामगिरीची दखल घेत त्याची चॅलेंज लेपरटेल एलआरएम पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हा सन्मान मिळविणारा किरीट भारताचा सातवा आणि पुण्यातील पहिलाच सायकलपटू ठरला आहे.

हेही वाचा – तिरंदाजीत आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचा दबदबा, युवा आशियाई स्पर्धेत ९ खेळाडूंना पदकाची कमाई, पदक विजेत्यांत पुण्याचे दोन खेळाडू

शालेय शिक्षण पार पडल्यावर अभियांत्रिकी महाविद्यालयातून एम.टेक.ची पदवी घेणारा किरीट महाविद्यालयीन काळात रोईंगचा खेळाडू होता. राज्य स्तरावर त्याने यशही मिळविले होते. पण, एका मोटर अपघातात त्याच्या पायाला दुखापत झाल्याने त्याला रोईंग सोडून द्यावे लागले. पण, रोईंगचा पंच म्हणूनही त्याने मान्यता मिळवली.

या दरम्यानच्या काळात वजन वाढल्याने किरीटला चिंतेत पाडले होते. अशा वेळेस निराश न होता, त्याने घरी वर्तमानपत्र टाकणाऱ्या मुलाबरोबर सायकलवरून वर्तमानपत्र टाकण्यास सुरुवात केली. त्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. वजन तर कमी होण्यास मदत झाली आणि सायकलिंगची गोडी लागली. अशा पद्धतीने अपघातानेच किरीट सायकलिंगकडे ओढला गेला. किरीटही हे मान्य करतो.

खऱ्या अर्थाने मी अपघाताने सायकलिंगकडे ओढला गेलो. रोईंगपटू होत असताना अपघात काय झाला, वजन काय वाढले आणि मग सायकलिंगची गोडी वाढली. आता सायकलिंग माझ्या आयुष्याचा एक भागच बनले आहे, असे किरीट म्हणाला.

हेही वाचा – जुन्या पुणे- मुंबई महामार्गावर बसला भीषण आग; ३३ प्रवासी थोडक्यात बचावले

अशाच सायकल प्रवासात वेगवेगळ्या मोहिमांची माहिती मिळत गेली आणि त्या मी पूर्ण करत गेलो. अशातच पुणे रॅनडोनियर संस्थेच्या प्रशांत जोग यांनी मला या आव्हानाची माहिती दिली. मी ते स्विकारले आणि सरावाला सुरुवात केली. पुणे-लोणावळा-पुणे, कधी कधी पुणे-देहु-पुणे असा सातत्याने सराव सुरु झाला. मुंबई-पुणे सायकल शर्यतीचा अनुभव असलेल्या संतोष पवार यांचे मार्गदर्शन मिळाले आणि माझा आव्हानात्मक सायकल प्रवासाला सुरुवात झाली. सिधये क्लासमध्ये शिक्षक म्हणून काम करताना सिधये सरांनी देखिल मला प्रोत्साहित केले. कुटुंबियांचे पाठबळ आणि देवाचे आशिर्वाद यामुळे मी हे आव्हान सहज पार करू शकलो.

लंडन-एडिनबर्ग-लंडन प्रवासाचा अनुभव सांगताना किरीट म्हणाला, सर्वात सुकर सायकल प्रवास होता. विशेष म्हणजे या मार्गावर मला कुठेही खड्डे आले नाहीत किंवा रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य वाहनांनी हॉर्न वाजवून त्रास दिला. प्रत्येक ठिकाणी मला पुढे जाऊ दिले जायचे आणि मग बाकी वाहने जायची, असे किरीट म्हणाला. भविष्यात काही करायचे राहिले आहे असे आता वाटत नाही. वयाची मर्यादा आड येऊ शकते. पण, सायकलिंग सुरु ठेवणार आहे आणि युवकांनी अन्य मोहांना बळी पडण्यापेक्षा सायकलिंगसारखा छंद जोपासावा इतकेच मला सांगावेसे वाटते, असे किरीटने सांगितले.

Story img Loader