पुणे: रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी भारतीय रेल्वेने स्थानकांच्या परिभ्रमण परिसरात आणि स्थानकांमध्ये पंतप्रधान भारतीय जनऔषधी केंद्रे स्थापन करून  त्यांना परवानाधारकांद्वारे चालविण्याचे धोरण तयार केले आहे. पुणे विभागातून जनऔषधी केंद्र सुरु करण्यासाठी पिंपरी स्थानकाची निवड करण्यात आली आहे.  हे केंद्र प्रवाशांना तसेच रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना औषध खरेदी करता येईल अशा ठिकाणी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लाखो दैनंदिन प्रवाशांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वे आपल्या स्थानकांवरील सुविधा आणि सुविधांमध्ये सातत्याने सुधारणा करत आहे.  या योजनेद्वारे रेल्वे स्थानकांवरील प्रवासी/अभ्यागतांना  दर्जेदार औषधे उपलब्ध करून देणे हा केंद्र सरकारच्या या योजनेचा मुख्य उद्देश्य आहे.  या व्यतिरिक्त स्वस्त दरात औषधे उपलब्ध करून समाजाच्या सर्व घटकांमध्ये निरोगीपणा वाढविणे, रोजगाराच्या संधी निर्माण करणे आणि जनऔषधी केंद्रे उघडण्यासाठी उद्योजकांना प्रोत्साहन देणे हे यामागील उद्दिष्ट आहे.

हेही वाचा… भाडेकरुकडून घरमालकाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पिंपरी स्थानकावरील केंद्रासाठी नि ई-लिलाव करण्यात आला होता. त्यामध्ये ५ हजार १११ रुपयांची सर्वोच्च बोली लावण्यात आली होती. त्यात डिलक्स फार्मसीला त्याच दिवशी स्वीकृती पत्र जारी करण्यात आले. या केंद्रातून औषध व्रिक्री  ४ जानेवारीपासून सुरू होईल. भारतीय औषध आणि वैद्यकीय उपकरण ब्युरोद्वारे ही सुविधा दिली जाईल. या माध्यमातू स्वस्त, दर्जेदार, जेनेरिक औषधे, सर्जिकल वस्तू, उपभोग्य इत्यादींचा पुरवठा सुलभ करेल. हे केंद्र औषधनिर्माण पदवी पदविकाधारकद्वारे चालवले जाईल. 

मध्य रेल्वेचे पिंपरी स्थानकावरील हे पहिलेच केद्र आहे. वाणिज्य, स्टोअर्स आणि अभियांत्रिकी विभागाच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे केंद्रविक्रमी वेळेत तयार झाले आहे. ब्रँडेड औषधे त्यांच्या अन-ब्रँडेड समतुल्यांपेक्षा लक्षणीयरीत्या जास्त किमतीत विकली जातात जरी उपचारात्मक मूल्यामध्ये दोन्ही औषधे  समान आहेत.  देशभरात पसरलेली गरिबी लक्षात घेता, वाजवी दरात दर्जेदार जेनेरिक औषधे बाजारात उपलब्ध करून दिल्यास सर्वांनाच फायदा होईल, असा रेल्वेचा प्रयत्न आहे.