वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर संगणकाच्या क्षेत्रातील वाढती गरज लक्षात घेऊन मंदार सराळकर याने हार्डवेअरच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर व्यवसायाची कोणतीही पाश्र्वभूमी नसताना त्याने कंपनी स्थापन केली. आजमितीला पुण्यातील सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी यांच्या फर्मबरोबरच कोकण, नाशिक भागातही कंपनीकडून सेवा पुरविल्या जातात. विशेष म्हणजे मंदार स्वत: जाऊन या सेवा पुरवितात. हार्डवेअरबरोबर सॉफ्टवेअरची मागणी लक्षात घेऊन एका मित्राबरोबर भागिदारीत मंदार यांनी सॉफ्टवेअर पुरविणारी कंपनीदेखील स्थापन केली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
युनिक सोल्युशन्स या हार्डवेअर कंपनीची स्थापना मंदार सराळकर यांनी २००६ मध्ये केली, तर प्रोटो युनिसीस टेक्नॉलॉजी या सॉफ्टवेअरची कंपनीची स्थापना मंदार नाईक यांच्याबरोबर गेल्या वर्षी केली. नाईक स्वत: सॉफ्टवेअर डेव्हलपर आहेत. या दोन्ही कंपन्या एकमेकांशी पूरक कामे करतात. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी घेतल्यानंतर संगणकाच्या क्षेत्रात काम करायचे, असे मंदार यांनी ठरवले नव्हते. २००२ मध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा इन हार्डवेअर अॅण्ड नेटवर्किंग हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केला आणि संगणकाच्या क्षेत्रात काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यानंतर केवळ आठशे रुपयांच्या पगारावर पहिली नोकरी त्यांना मिळाली. नोकरी करत असतानाच हार्डवेअरचे व्यवसायाभिमुख ज्ञान मिळत गेले आणि मंदार यांनी कंपनी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीचा त्यांचा प्रवास खडतर होता. पूर्वीचे संगणक आकाराने मोठे होते. घरी जाऊन संगणक फॉरमॅट करणे, इन्स्टॉलेशन करणे अशा प्रकारची कामे २००५ पर्यंत सुरू होती. तेव्हा संगणक फॉरमॅटकरिता मंदार ग्राहकांकडून फक्त शंभर रुपये घेत. अशा कामाच्या अनुभवातून २००६ मध्ये त्यांनी युनिक सोल्युशन्स कंपनीची स्थापना झाली.
सन २००० नंतर पुढची पाच-सहा वर्षे हार्डवेअरच्या क्षेत्रात बऱ्याच कंपन्या उतरल्या होत्या. परंतु, या क्षेत्रात केवळ हार्डवेअरसाठीच्या नोकऱ्या मोठय़ा प्रमाणात नव्हत्या. त्यामुळे नोकरीची हमी देणारे हार्डवेअरचे व्यावसायिक अभ्यासक्रम करण्याकडे तरुणांचा तेव्हा कल होता. केवळ हार्डवेअरच्या ज्ञानावर नोकरी मिळणे अशक्यप्राय होते. त्यात माझ्या घराण्यात व्यवसाय कोणी केला नव्हता, त्यामुळे तो कसा करायचा याचे फारसे ज्ञान नव्हते. त्यामुळे व्यवसाय अयशस्वी झाल्यास हाती दुसरा पर्याय असावा, या हेतूने सिस्को सर्टिफाइड नेटवर्क असोसिएट्स (सीसीएनए) आणि मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड प्रोफेशनल असे दोन्ही अभ्यासक्रमही पूर्ण केले, असे मंदार सांगतात.
व्यवसाय सुरू केला तेव्हा संगणक विकत घ्यायचा, तर तो ४०-५० हजारांच्या घरात जात असे. त्यामुळे नवख्या लोकांना क्वचितच संगणक अॅसेम्बल्ड करण्याची संधी मिळत असे. अभ्यासक्रमांतर्गत उघडलेल्या संगणकांची दुरुस्ती करण्याचे प्रशिक्षण मंदार यांनी घेतले होते. जेव्हा औंध भागात संगणक दुरुस्तीसाठी ते पहिल्यांदा गेले, तेव्हा संगणक उघडतानाही समस्या आल्या, अशा अनुभवांमधून शिकत त्यांनी एकटय़ाच्या जोरावर कंपनीचा विस्तार केला आहे. सद्य:स्थितीत पुण्यासह कोकण, नाशिक अशा विविध भागांतून हार्डवेअरची कामे आणि सनदी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी यांच्या फर्मची कामे कंपनीकडे आहेत. विशेष म्हणजे मंदार यांनी व्यवसायाची कोणत्याही प्रकारची जाहिरात आजवर केलेली नाही. केवळ तोंडी प्रसिद्धी आणि एकदा सेवा दिल्यानंतर कमावलेला विश्वास या जोरावरच त्यांनी एवढी मजल मारलेली आहे. कंपनीची धुरा एकटय़ा मंदार यांच्यावरच असून ते स्वत: हार्डवेअरची कामे करतात. सेवा देण्यात कोणतीही कसूर राहू नये आणि मिळालेला ग्राहक टिकून रहावा यासाठी ते स्वत: संबंधित सर्व कामे करतात. कर्वेनगर येथे कंपनीचे सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
हार्डवेअरचा सेटअप करताना अनेकांना सॉफ्टवेअरचा सेटअप लागत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच युनिक सोल्युशनसाठी एक सॉफ्टवेअर तयार करायचे होते. याच काळात मंदार नाईक या तरुणाशी मंदार यांची ओळख झाली आणि त्यातून एक सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करण्याची कल्पना पुढे आली. नाईक यांचे सॉफ्टवेअर व मंदार यांचे हार्डवेअर अशा दोन्ही सेवा देता येतील, या उद्देशाने २०१७ मध्ये प्रोटो युनिसीस टेक्नॉलॉजी कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीची लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप कंपनी म्हणून नोंद करण्यात आली आहे. जीएसटी बिलिंग संगणकीय प्रणाली विकसित करणे, रुग्णालय व्यवस्थापन प्रणाली, संकेतस्थळ अशा विविध चौदा सेवा दिल्या जातात. विपणनाकरिता वेगळा चमू नेमण्यात आला आहे. सॉफ्टवेअरच्या ठिकाणी हार्डवेअरची कामे असतातच. त्यामुळे दोन्ही कंपन्या एकमेकांना पुरक अशा पद्धतीने सेवा देतात.
हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात आज प्रचंड स्पर्धा आहे. स्पर्धेत टिकण्यासाठी विश्वास आणि दिलेला शब्द पाळणे हे खूप महत्त्वाचे आहे. या जोरावरच दोन्ही कंपन्यांची वाटचाल सुरू आहे. समाजमाध्यमे, संकेतस्थळ आणि विविध माध्यमातून दोन्ही कंपन्यांची प्रसिद्धी करून अधिकाधिक ग्राहकांना सेवा देण्याचा मानस आहे, असे मंदार सांगतात.
prathamesh.godbole@expressindia.com