पिंपरी चिंचवडमध्ये अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. कोयत्याने तोडफोड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला घाबरवण्यासाठी ही तोडफोड करण्यात आल्याचं फिर्यादीने सांगितलं आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिंपरी चिंचवडच्या पिंपळे गुरव परिसरात मध्यरात्री पाच ते सहा जणांच्या अज्ञात टोळक्याने हातात कोयता आणि लाकडी दांडके घेऊन दहशद माजवत तब्बल ८ ते १० वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सांगवी पोलिसात पाच अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तोडफोडीचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पिंपळे गुरव परिसरात दुचाकीवर आलेल्या अज्ञात नऊ जणांच्या टोळक्याने दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे.शहरातील लक्ष्मी नगर परिसरात ही घटना घडली आहे.रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांची कोयते, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉड ने वाहनांच्या काचा फोडून सामान्य नागरिकांच्या वाहनांचे नुकसान केले आहे. दरम्यान,आरोपी हे सांगवी पोलिसात फिर्याद दिलेल्या महिलेचा मुलगा हा तोडफोड केलेल्या आरोपी बाबत गोपनीय माहिती देत असल्यानेच त्याला घाबरवण्यासाठी दहशद माजवत तोडफोड केल्याचं पोलीस सूत्रांकडून सांगितलं जातं आहे.घटनेप्रकरणी अद्याप कोणाला ही ताब्यात घेतलं नसून पुढील तपास सांगवी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Story img Loader