पुणे : नदीपात्रातील रस्त्यावर गेल्या चार ते पाच दिवसांपासून ढोल-पथकांचा सराव सुरू झाला असून पोलीस परवानगीशिवाय हा सराव सुरू असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या ढोल-ताशा पथकांवर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे. नदीपात्रातील जागेसह हिंगणे, कोथरूड, हडपसर, कात्रज आदी भागांत सध्या विविध पथकांचा नियमबाह्य दणदणाट सुरू झाला आहे. त्यामुळे सरावाच्या परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागतो आहे.

गेले दोन वर्ष करोना निर्बंधामुळे गणेशोत्सव अतिशय साधेपणाने साजरा करण्यात आला. निर्बंधाच्या सावटात उत्सव साजरा करण्यात आला होता. ‘श्रींं’ची प्रतिष्ठापना तसेच विसर्जन मिरवणुकीला परवानगी देण्यात आली नव्हती. वैभवशाली परंपरा असलेल्या पुण्यातील गणेशोत्सवात राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून भाविक येतात. गेल्या काही वर्षांपासून ढोल-पथके उत्सवातील आकर्षण ठरली आहेत. ढोल-ताशांचे वादन तरुणाईचे आकर्षण आहे. अनेक महाविद्यालयीन युवक-युवती ढोल पथकात सहभागी होतात. सुरुवातीला शहरातील पथके मर्यादित स्वरुपात होती. गेल्या काही वर्षांपासून पथकांची संख्या वाढीस लागली आहे.

dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Shivaji Park ground, Shivaji Park, MNS Shivaji Park,
शिवाजी पार्कचे मैदानाचा निर्णय गुलदस्त्यात, महायुतीने मैदान अडवल्यामुळे ४५ दिवसांची मर्यादा संपल्याचा मनसेचा आरोप
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
four pistols seized pune
पुणे: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सराइतांकडून चार पिस्तुले जप्त, पोलिसांकडून तिघे अटकेत

शनिवार-नारायण पेठेतील नदीपात्रातील रस्ता, एरंडवणेतील डीपी रस्ता परिसरात ढोल पथकांकडून उत्सवापूर्वी सराव सुरू केला जातो. ढोल-ताशा पथकाच्या सरावामुळे स्थानिकांना विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना त्रास होत असल्याने पथकांनी सराव करण्यापूर्वी पोलीस परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र, गेल्या आठवड्यापासून नदीपात्रातील ओंकारेश्वर मंदिराजवळ पथकाने सराव सुरू केला आहे. या पथकाने पोलिसांकडून परवानगी घेतली नसल्याचे समजते.

ढोल-ताशा पथकांनी सराव सुरू करण्यापूर्वी पोलीस परवानगी घेणे बंधनकारक आहे. नदीपात्र परिसर डेक्कन तसेच शिवाजीनगर पोलीस ठाण्यांच्या अखत्यारीत येतो. संबंधित वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना सूचना देण्यात आल्या आहेत.

– प्रियंका नारनवरे, पोलीस उपायुक्त, परिमंडळ एक

उपनगरात दणदणाट

नदीपात्रातील रस्त्यावर ढोल-ताशा पथकांकडून सराव केला जातो. गेल्या काही वर्षांपासून उपनगरात ढोल-ताशा पथके तयार करण्यात आली. सिंहगड रस्ता, धायरी, कात्रज, धनकवडी, बिबवेवाडी भागात पथकांचा सराव सुरू असतो. उपनगरातील पथकांकडून दररोज सायंकाळी सराव सुरू करण्यात आला आहे.