पुणे : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील काही मतदारसंघांचा समावेश आहे. त्यामुळे या मतदानावर अवकाळी पावसाचे गडद सावट निर्माण झाले आहे. सोमवारी (१३ मे) दुपारी तीननंतर पावसाचा जोर जास्त राहण्याचा अंदाज आहे. पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला नारंगी आणि नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला पिवळा इशारा दिला आहे.

हवामान विभागाने पुणे, नगर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला नारंगी इशारा दिला आहे. या जिल्ह्यात अवकाळीसह गारपीट होण्याची शक्यता आहे. नारंगी इशारा असलेल्या जिल्ह्यांत जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. नंदुरबार, जळगाव आणि बीड जिल्ह्याला पिवळा इशारा दिला असून, या जिल्ह्यांत नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे.

devendra fadnavis assured to farmers if rate is less than guaranteed price government will pay difference
“हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास फरकाची रक्कम सरकार देणार,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्‍वासन
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Assembly Elections 2024 Akkalkuwa-Akrani Assembly Constituency Congress
लक्षवेधी लढत: अक्कलकुवा: लोकसभेतील पराभवाचे उट्टे काढणार का?
Sharad Pawar, Sudhir Kothari Hinganghat,
वर्धा : अखेर शरद पवार थेट ‘हिंगणघाटच्या शरद पवारां’च्या घरी, म्हणाले…
Assembly Election 2024 Malegaon Outer Constituency Dada Bhuse print politics news
लक्षवेधी लढत: मालेगाव बाह्य : मंत्री दादा भुसे यांचा मार्ग यंदा खडतर
Ajit Pawar lashed out at the group over the issue of disclaimer regarding the clock symbol print politics news
घड्याळाबाबत अस्वीकरणाच्या मुद्द्यावरून अजित पवार गटाला फटकारले
How much money can be carried during elections
महत्त्वाचे! निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात, जाणून घ्या…
issue in pimpri assembly constituency
गुन्हेगारी, अतिक्रमणे, अनारोग्य आणि प्रदूषण; वाचा कोणत्या मतदारसंघात आहेत ‘या’ समस्या

हेही वाचा…भाजप कार्यकर्त्यांकडून पैशांच वाटप सुरू रवींद्र धंगेकराचा आरोप, सहकारनगर पोलिस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकराच ठिय्या आंदोलन सुरू

हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यपी म्हणाले, सकाळच्या सत्रात हवेत गारवा असेल, तापमानही कमी असेल त्यामुळे प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिकांनी सकाळच्या सत्रात मतदान करण्याला प्राधान्य द्यावे. अन्य मतदारांनी दुपारपर्यंत मतदान उरकून घ्यावे. साडेतीननंतर मेघगर्जना आणि ताशी ४० ते ६० किलोमीटर प्रति तास वेगाने वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज आहे. गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला असला तरीही गारपीट होण्याची शक्यता कमी आहे.

‘ऑरेंज अलर्ट’ दिलेले जिल्हे

जालना, छत्रपती संभाजीनगर, पुणे, नगर
(लोकसभा मतदारसंघ – जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, नगर, शिर्डी )

हेही वाचा…मावळातील सरासरी मतदान ६० टक्केच, यंदा किती होणार मतदान?

‘यलो अलर्ट’ दिलेले जिल्हे

नंदुरबार, जळगाव, बीड
(लोकसभा मतदारसंघ – नंदुरबार, जळगाव, रावेर, बीड )