‘पुणे तिथे काय उणे’ असे म्हटले जाते. इतके दिवस चातकासारखी वाट पाहत असलेल्या पावसाचे उणेपण दूर झाल्यामुळे निसर्ग हिरवागार आणि टवटवीत झाला आहे. आषाढामध्ये नटलेल्या हिरवाईमध्ये गुरूंचे वंदन करणारी गुरुपौर्णिमा आणि मन प्रफुल्लित करणाऱ्या श्रावणाचे वेध सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्यनगरीला लागले आहेत. सकाळची स्वरमैफल, ज्येष्ठ गायक आणि संवादिनीवादक यांची गुरुवंदना, साहित्य संमेलनाध्यक्षांची मुलाखत आणि ‘ऑनर कििलग’ अशा ज्वलंत विषयावरील जागतिक आढावा घेणाऱ्या पुस्तकाचे प्रकाशन अशा नानाविध कार्यक्रमांनी हा आठवडा रंगणार आहे. या आठवडय़ामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचा नजराणा पुणेकरांना खरोखरीच श्रीमंत करून जाणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अभिजात संगीताची कोणतीही मैफल असो किंवा सुगम संगीताचा कार्यक्रम; त्यामध्ये स्वरांशी पाठलाग करीत रसिकांशी सुसंवाद साधणारी संवादिनी ही गायकाएवढीच महत्त्वाची. संवादिनीवादनामध्ये आघाडीचे नाव आहे ते ज्येष्ठ संवादिनीवादक प्रमोद मराठे यांचे. प्रमोद मराठे साथीला असल्यानंतर गायक कलाकारही कलाविष्कार सादर करताना खुलतात याची प्रचिती संगीत रसिकांना अनेकदा आलेली आहे. प्रकृती अस्वास्थ्यतेच्या प्रतिकूलतेवर मात करीत प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी संवादिनीवादनाशी सुरेल संवाद साधला आहे. उत्तम संवादिनीवादक असलेले मराठे हे गुरू म्हणूनही आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे. विद्यादानाच्या माध्यमातून ही कला पुढे नेण्यासाठी गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या मराठे यांनी अनेक कलाकार घडविले आहेत. मििलद कुलकर्णी, रोहित मराठे आणि तन्मय देवचके ही त्यापैकी आश्वासक नावे. मराठे यांच्या शिष्यपरिवारातर्फे सोमवारपासून दोन दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे गुरू पं. प्रमोद मराठे यांना गुरुवंदना अर्पण करण्यात येणार आहे. गांधर्व महाविद्यालयाच्या ‘विष्णू-विनायक स्वर मंदिरा’मध्ये सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमात मराठे यांच्या शिष्यांचे संवादिनीवादन होणार आहे. मंगळवारी दस्तुरखुद्द प्रमोद मराठे यांच्या संवादिनीवादनाने गुरुवंदना कार्यक्रमाची सांगता होईल.

सकाळच्या रागांची स्वरमैफल

संगीत कलेला एक प्रकारची शिस्त आहे. अगदी कोणत्या प्रहरी कोणते राग गायचे किंवा या रागांचे वादन करायचे हे देखील निश्चित ठरलेले असते. एके काळी तीन रात्री स्वरांचा आनंद देणाऱ्या ‘सवाई संधर्व भीमसेन महोत्सवा’मध्ये वेगवेगळ्या प्रहरांचे राग रसिकांना ऐकता येत होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाची रात्री दहापर्यंतची बंधने आल्यानंतर संगीतप्रेमींचा हा आनंद हिरावला गेला. आता दिवाळी पहाट मैफलींमध्येच सकाळचे राग आळविले जातात. संगीत रसिकांना सकाळच्या रागांचा आनंद देण्याच्या उद्देशातून व्हायोलिन अ‍ॅकॅडमी आणि स्वरझंकार यांच्यातर्फे रविवारी (२४ जुलै) सकाळची स्वरमैफल आयोजित करण्यात आली आहे. एस. एम. जोशी सभागृह येथे सकाळी साडेनऊ वाजता होणाऱ्या या मैफलीमध्ये जयपूर घराण्याच्या युवा गायिका सानिया पाटणकर यांचे गायन आणि पं. राजेंद्र कुलकर्णी यांचे बासरीवादन होणार आहे. त्यांना रोहित मराठे संवादिनीची तर, सुभाष कामत आणि श्रीकांत भावे तबल्याची साथ करणार आहेत.

‘ऑनर कििलग : एक जागतिक सैराट’चे प्रकाशन

‘ऑनर कििलग’ म्हणजे समाजातील स्वत:ची आणि कुटुंबाची प्रतिष्ठा, मान-सन्मान आणि अब्रू राखण्याच्या नावाखाली स्वत:च्या मुलीचा अमानुषपणे खून करणे, हत्या करून समाजामध्ये पुन्हा ताठ मानेने फिरणे हे कृत्य मानवतेला काळिमा फासणारे असेच आहे. तरीही दरवर्षी ऑनर कििलगच्या नावाखाली जगभरात २० हजार निरपराध मुलींची हत्या होते या कटू सत्यावर लेखक रंगा दाते यांनी ‘ऑनर कििलग : एक जागतिक सैराट’ या पुस्तकाद्वारे प्रकाश टाकला आहे. आंतरजातीय विवाह केल्यानंतर त्या महिलेवर होणारा अत्याचार, छळ आणि घरच्यांकडून होणारी तिची हत्या अशा जगातील घटनांचा वेध घेतलेल्या या पुस्तकाचे शनिवारी (२३ जुलै) प्रकाशन होत आहे. ‘साहित्य दरबार’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. डेक्कन जिमखान्यावरील सुवर्णस्मृती कार्यालयामध्ये सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास ज्येष्ठ साहित्यिक-सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट, शिवसेना प्रवक्तया आमदार डॉ. नीलम गोऱ्हे आणि दहशतवादविरोधी पथकाच्या पुणे विभागाचे सहायक पोलीस आयुक्त भानुप्रताप बर्गे उपस्थित राहणार आहेत.

वादे-संवादे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील टीकाटिप्पणीने वादग्रस्त ठरलेले साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची ‘वादे-संवादे’अंतर्गत रविवारी (२४ जुलै) प्रकट मुलाखत प्रसिद्ध लेखक राजन खान घेणार आहेत. अक्षरधारा बुक गॅलरीतर्फे टिळक रस्त्यावरील मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृह येथे सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

आवाहन

विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती पुणेकरांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘लोकसत्ता पुणे’मध्ये ‘सांस्कृतिक पुणे’ हे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. आगामी सप्ताहातील सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती पुढील पत्त्यावर पाठवू शकता. पत्ता – ‘एक्स्प्रेस हाऊस’, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, शिवाजीनगर, पुणे – ४११००४.  ईमेल – lokpune4@gmail.com