युपीएससीची तयारी करणाऱ्या एका ३२ वर्षीय तरुणाने पुण्यातील वृद्ध दाम्पत्याचा खून केल्याचा धकादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रसन्न मुरगुटकर (३२) असं आरोपी तरुणांचं नाव आहे. तर शंकर काटे आणि संगिता काटे असं वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. शनिवारी (११ फेब्रुवारी) रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला अटक केली आहे. तसेच आरोपीच्या आईला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी घेण्यासाठी त्याने दोघांचा खून केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – पुणे : सासरच्या छळाला कंटाळून नवविवाहित तरुणीची आत्महत्या; पतीसह सासू, सासऱ्यांविरुद्ध गुन्हा

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Maharani Laxmi Bai Medical College, in Jhansi district
Jhansi Hospital Fire : नर्सने काडीपेटी पेटवली अन्… १० अर्भकांचा जीव घेणाऱ्या झाशी रुग्णालयात आग कशी लागली?
Accused who escaped after killing friend arrested
मित्राचा खून करून पसार झालेला आरोपी गजाआड, ससून रुग्णालय परिसरात कारवाई
mumbai 16 year old deaf mute girl raped
मुंबई : मूक-बधीर मुलीवर लैंगिक अत्याचार
bihar man murder Mumbai
मुंबई: हातावर गोंदवलेल्या प्रेयसीच्या नावामुळे लागला हत्येचा छडा, प्रेमप्रकरणावरून बिहारमधील तरुणाची मुंबईत हत्या

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी प्रसन्न मुरगुटकर हा युपीएससीची तयारी करत असून त्याने शनिवारी रात्री शंकर काटे आणि संगिता काटे यांचा खून केला. त्यानंतर घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना स्थानिकांनी त्याला रक्ताने माखलेल्या अवस्थेत काटे यांच्या घरातून बाहेर पडताना पाहिले आणि त्याला पकडून ठेवले. तसेच या घटनेची माहिती त्यांनी पोलिसांनी दिली.

हेही वाचा – पुणे : दगडूशेठ हलवाई गणपतीला सूर्यकिरणांचा अभिषेक

दरम्यान, पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत, आरोपीला अटक केली असून आपल्या आईला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी त्याने दोघांचा खून केला असल्याची माहिती भोसरी पोलिसांनी दिली.