युरोपियन मराठी स्नेह-संमेलन संयोजन समिती आणि कॅलेक्स मीडिया व एन्टरटेन्मेंट यांच्यातर्फे स्कॉटलंडमधील अबरडीन येथे १८ ते २० एप्रिल या कालावधीत दहावे युरोपियन मराठी स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले आहे.
या स्नेहसंमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या हस्ते करण्यात झाले. ज्येष्ठ अभिनेत्री रिमा लागू, कॅलेक्स समूहाचे सुनील सोमाणी, कार्यकारी संचालक डॉ. गौरव सोमाणी, संयोजन समितीच्या सदस्या मुक्ता आफळे या वेळी उपस्थित होत्या. ‘चिमणराव ते गांधी’ हा प्रभावळकरांचा एकपात्री प्रयोग, किरण यज्ञोपवित दिग्दर्शित ‘सलाम’ या चित्रपटाचा प्रीमियर, सोनाली कुलकर्णी आणि मििलद फाटक यांच्या भूमिका असलेल्या ‘व्हाईट लिली नाईट रायडर’ या नाटकाचा प्रयोग, माजी कसोटीपटू दिलीप वेंगसरकर यांच्याशी गप्पा, असे कार्यक्रम या स्नेहसंमेलनात होणार असल्याची माहिती आफळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा