पुणे : कर्करोगाच्या अचूक उपचारासाठी प्रथमच कृत्रिम प्रज्ञेवर (एआय) आधारित सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रिअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. एआय आधारित रेडिएशन उपचार पद्धतीचा अवलंब करून दोन रुग्णांनी कर्करोगावर यशस्वी मात केली आहे. यातील एकाला फुफ्फुस तर दुसऱ्याला प्रोस्टेट कर्करोग होता.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
टीजीएच- ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरमध्ये हे उपचार करण्यात आले आहे. यातील फुफ्फुसाचा कर्करोग असलेला रुग्ण ७० वर्षांचा आणि प्रोस्टेट कर्करोग असलेला रुग्ण ६२ वर्षांचा होता. या रुग्णांवर एआय तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वी उपचार करण्यात आले. तळेगाव येथील रुग्णाला श्वसनाचा त्रास होत होता. तपासणीत त्याच्या डाव्या बाजूच्या फुफ्फुसात कर्करोगजन्य गाठ आढळून आली. दुसऱ्या प्रकरणात सोलापूर येथील ६२ वर्षीय पुरुषाला मागील एका महिन्यापासून मूत्रमार्गासंबंधीत समस्या उद्भवू लागल्या होत्या. तज्ज्ञांनी केलेल्या तपासणीअंती रुग्णाला प्रोस्टेट कर्करोगाचे निदान झाले.
हेही वाचा – एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर, यंदा किती विद्यार्थी १०० पर्सेंटाइलचे मानकरी?
याबाबत डॉ. अभिषेक पुरकायस्थ म्हणाले की, कृत्रिम प्रज्ञा आधारित सिंक्रोनी ऑटोमॅटिक, रिअल-टाइम मोशन सिंक्रोनाइझेशन तंत्रज्ञान असलेली आधुनिक प्रणाली उपचारांसाठी अचूक आणि सुरक्षित पर्याय ठरत आहे. फुफ्फुस, यकृत, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल आणि प्रोस्टेट कर्करोग यासारख्या विविध कर्करोगांवर या माध्यमातून यशस्वी उपचार करणे शक्य आहे. या कृज्ञिम प्रज्ञा यंत्रणेत एका बाजूला एक्स-रे पॅनल आणि दुसऱ्या बाजूला डिटेक्टर असतो. सिंक्रोनी रेस्पिरेटरी कॅमेराच्या मदतीने कर्करोगाचे स्थान अचूकपणे शोधता येते. यामुळे रेडिएशन उपचारांमध्ये आसपासच्या निरोगी पेशींचे नुकसान अतिशय कमी प्रमाणात होते. ही नवीन उपचारप्रणाली कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यात अचूक कामगिरी बजावते. या रुग्णांनी कोणतेही तीव्र दुष्परिणाम न अनुभवता उपचारांना चांगला प्रतिसाद दिला. सध्या रुग्णांची प्रकृती वैद्यकीयदृष्ट्या स्थिरावली आहे.
हेही वाचा – पुणे पोलिसांची मोठी कारवाई; कोट्यवधींचा गुटखा कुठे केला जप्त?
रुग्णावर योग्य वेळी उपचार न केल्यास कर्करोगाचा प्रसार संपूर्ण शरीरात होऊ शकतो. त्यामुळे रुग्ण बरा होऊ शकत नाही आणि त्यातून त्याचा मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे लवकर निदान आणि वेळेत उपचार या बाबी कर्करोगामध्ये महत्त्वाच्या ठरतात. – डॉ. अभिषेक पुरकायस्थ