पिंपरी: सेक्स पॉवर वाढवण्यासाठी आणि जिममध्ये अधिक जोमाने व्यायाम करण्यासाठी मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनचा कॉलेजमधील तरुणी आणि तरुण वापर करत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. रवी थापा या व्यक्तीला पिंपरी- चिंचवडच्या खंडणी विरोधी पथकाने अटक केली असून त्याच्याकडून ६०० ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बॉटल्स जप्त केल्या आहेत. या धक्कादायक प्रकारामुळे आपल्या पाल्यावर पालकांनी नजर ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पिंपरीतील एका नामांकित महाविद्यालयाच्या परिसरात रवी थापाला पोलिसांनी गांजाच्या थैलीसह ताब्यात घेतलं होतं. त्याच्याकडून सहाशे ग्रॅम गांजा आणि मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शनच्या ९५ बॉटल्स जप्त केल्या आहेत. आरोपीकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे सेक्स पॉवर वाढवण्यासाठी सर्रास वापर करत असल्याचं उजेडात आले आहे. तसेच सुदृढ शरीर दिसण्यासाठी तासनतास व्यायाम करणारे तरुण देखील हे इंजेक्शन घेत असल्याचं पुढं आले आहे. या इंजेक्शनमुळे सेक्स पॉवर तर व्यायाम करताना अधिक जोमाने आणि अधिक ताकतीने व्यायाम करत असल्याचं आरोपीने पोलिसांना सांगितला आहे, तसा दावा त्याने केला आहे. याप्रकरणी रवी थापाला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयात हजर केला असता रवी थापाला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

sexual assault at anna university
Chennai Crime: चेन्नईत रस्त्यावरील ठेलेवाल्याचा कॉलेज कॅम्पसमध्येच विद्यार्थिनीवर बलात्कार; सत्ताधाऱ्यांशी संबंध असल्याचा विरोधकांचा आरोप!
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Egg thrown at a Bengaluru BJP MLA Munirathna
BJP MLA Munirathna Naidu: बलात्कार प्रकरणात जामीन मिळालेल्या भाजपा आमदारावर अंडी फेकली; तिघांना अटक
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
kalyan rape murder case vishal gawali
Video : शेगावात वैद्यकीय तपासणीनंतर विशाल गवळीची कल्याणकडे रवानगी, मध्यरात्री…
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
youth attacked police Mumbai, youth obstructed traffic ,
मुंबई : वाहतुकीला अडथळा निर्माण करणाऱ्या तरुणाचा पोलिसावर हल्ला, हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल
kalyan east minor girl rape case
कल्याण पूर्वेतील अल्पवयीन मुलीच्या हत्येप्रकरणी दोन जण अटक, दाढी करून पेहराव बदलत असताना विशाल गवळीवर पोलिसांची झडप

आणखी वाचा- पुण्यानंतर आता पिंपरीत कोयता गॅंगची दहशत

कॉलेजमध्ये असलेल्या तरुण-तरुणीच्या आई-वडिलांना पोलिसांनी आवाहन केलं असून अशा व्यसनापासून आपल्या मुलांना दूर ठेवण्याचं आवाहन त्यांनी केले आहे. अशा प्रकारच्या व्यसनाचे पुढे चालून दूरगामी परिणाम होऊ शकतात असे देखील पोलिसांनी म्हटलं आहे. मेफेनटरमाइन सल्फेट इंजेक्शन हे ब्लड प्रेशर लो झालेल्या आणि प्रसुती वेदनासाठी (कळा) इंजेक्शन वापरलं जातं. परंतु, त्याचा अशा पद्धतीच्या व्यसनासाठी देखील वापर होत असल्याचं आता समोर आला आहे. ही कामगिरी खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या टीमने केली आहे.

Story img Loader