पुणे : राजकारणात देव आणल्याने देवाचे देवपण धोक्यात येते. पक्षाबरोबर देवाच्या चरित्राची चर्चा होते. बिन शिखराच्या मंदिराचे उद्घाटन करणे धर्मशास्त्रात बसत नसेल तर भाजपकडून झालेले हे हिंदू धर्माचे अवमूल्यन नाही का ? फक्त निवडणुकांसाठी रामाचा वापर केला जात आहे, अशा शब्दांत महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी यांनी रविवारी भाजपवर टीका केली.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युवक क्रांती दलाच्या वतीने आयोजित ‘गांधी दर्शन’ शिबिरात डाॅ. कुमार सप्तर्षी बोलत होते. शिबिरामध्ये राज कुलकर्णी यांनी ‘गांधी, नेहरू समजून घेताना’, राजू परुळेकर यांनी ‘भारतीय लोकशाहीवर आलेली संक्रांत आणि विरोधी पक्षांचे पानिपत’ या विषयावर मार्गदर्शन केले.’ ‘गांधी दर्शन’ विषयावरचे हे नववे शिबीर होते.

हेही वाचा – स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे यांच्या पार्थिवावर उद्या शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

डॉ. कुमार सप्तर्षी म्हणाले, की नागरिकांची जागरूक असलेली विवेकबुद्धी किती आणि बंधुभाव यावर देशाची प्रगती अवलंबून असते. प्रत्यक्षात मात्र, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रामाच्या नावाने वातावरण निर्मिती करून मती गुंग करण्याचे काम भाजप करीत आहे. निवडणुकांसाठी रामाचा वापर चुकीचा आहे.

हेही वाचा – शरद मोहोळवर गोळीबार करणाऱ्या पोळेकरविरुद्ध आणखी एक गु्न्हा दाखल; कटात सामील होण्यास नकार दिल्याने तरुणावर गोळीबार

सत्याग्रह ही भारताने जगाला दिलेली अनमोल देणगी आहे. या मार्गामुळे मला ६२ वेळा अटक झाली. पण, सर्व आंदोलने यशस्वी झाली. शारीरिक, सामूहिक बल कमी असले तरी अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रेरणा सत्याग्रहाने दिली. सत्याग्रह फक्त परकीयांविरुद्ध करायचा हा भ्रम पसरवला जात होता. मात्र, स्वकीय चुकत असतील तर त्याविरुद्ध देखील सत्याग्रह करता येतो आणि केला पाहिजे, असेही डॉ. कुमार सप्तर्षी यांनी सांगितले.

Story img Loader