पुणे : डाॅक्टरांच्या सल्ल्याने देण्यात येणाऱ्या झोपेच्या गोळ्यांचा वापर नशेसाठी करण्यात येत असल्याचे उघडकीस आले आहे. येरवडा भागात गोळ्यांची विक्री करणाऱ्या एकास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आसिफ अकबर शेख (वय १९, रा. राजीव गांधीनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. काही आजारांवर डाॅक्टरांच्या सल्ल्याने झोपेच्या गोळ्या देण्यात येतात. या गोळ्यांचे सेवन केल्यानंतर झोप येते. येरवडा भागातील काहीजण या गोळ्यांचा वापर नशेसाठी करत असल्याची माहिती येरवडा पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर पोलीस गोळ्यांची विक्री करणाऱ्याचा शोध घेत होते.

हेही वाचा – पुणे : प्रियकराबरोबर पळून जाताना पत्नीने घरातील दागिने, रोकड चोरली

आरोपी शेख येरवडा भागात गोळ्या विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलीस कर्मचारी अमजद शेख आणि अनिल शिंदे यांना मिळाली. पोलिसांनी सापळा रचून शेखला पकडले. त्याच्याकडून नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्यांची २२ पाकिटे जप्त केली. गोळ्यांच्या पाकिटांची किंमत २२०० रुपये आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक जयदीप गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अंकुश डोंबाळे, गणपत थिकोळे, दत्ता शिंदे, तुषार खराडे, अमजद शेख, किरण घुटे, सागर जगदाळे, कैलास डुकरे आदींनी ही कारवाई केली.