मराठी, हिंदी चित्रपटात तसेच हिंदी नाट्यसृष्टीत आपल्या अभिनयाचा स्वंतत्र ठसा उमटवणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ज्येष्ठ अभिनेत्री उत्तरा बावकर (वय ७९) यांचे खासगी रुग्णालयात निधन झाले. त्या अविवाहित होत्या. गेल्या दीड वर्षापासून बावकर या पोटाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. बाणेर येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> उन्हाळ्यात रेल्वेच्या विशेष गाड्या; पुणे, मुंबईतून सात गाड्यांच्या ८८ फेऱ्या

बावकर या ज्येष्ठ नाट्यदिग्दर्शक इब्राहिम अल्काझी यांच्या तालमीत तयार झालेल्या त्या अभिनेत्री होत्या. त्यांनी दिल्ली येथील रंगभूमीवर ‘ऑथेल्लो’, गिरीश कर्नाड यांच्या “तुघलक’सह अनेक नाटकांत काम केले होते. जयवंत दळवी यांच्या “संध्या छाया’ नाटकाचे “कुसुम कुमार’ या नावाने हिंदीत रुपांतर करून त्याचे दिग्दर्शनही बावकर यांनी केले होते. रंगभूमीवरील योगदानाबद्दल त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ‘एक दिन अचानक’ या चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेसाठी त्या राष्ट्रीय पुरस्काराच्या मानकरी ठरल्या होत्या. मराठीमध्ये दोघी, उत्तरायण, शेवरी, रेस्टॉरन्ट, वास्तुपुरुष, हा भारत माझा, संहिता, नितळ, बाधा या मराठी चित्रपटात त्यांनी काम केले होते.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uttara baokar death veteran actress uttara baokar passed away pune print news zws
Show comments