शहरात कॅार्बोव्हॅक्स, कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड लशींच्या नि:शुल्क मात्रा मंगळवारी केवळ सहा केंद्रांवरच दिल्या जाणार आहेत. रक्षाबंधनानिमित्त अन्य केंद्रांना सुट्टी देण्यात आली आहे.
धायरीतील कै. मुरलीधर लायगुडे दवाखाना, मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालय, येरवडा येतील भारतरत्न स्व. राजीव गांधी रुग्णालय, कोथरूड येथील कै. जयाबाई सुतार दवाखाना, हडपसरमधील कै. अण्णासाहेब मगर रुग्णालय आणि सहकारनगर येथील कै. शिवशंकर पोटे दवाखाना या सहा दवाखान्यात लस उपलब्ध असणार आहे.
राज्या शासनाच्या आदेशानुसार आरोग्य विभागाच्या मुख्य लसीकरण विभागाकडून १५ जुलै पासून शहरामध्ये सर्व नागरिकांना नि:शुल्क कोव्हॅक्सि, कोव्हिशिल्ड लशींच्या मात्रा दिल्या जात आहेत. त्यासाठी महापालिकेने ६८ केंद्र निश्चित केली आहेत. मात्र रक्षाबंधनानिमित्त सुट्टी असल्याने नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सहा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे.