पुणे : पोर्श कार अपघात प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेत आलेल्या वडगाव शेरी मतदार संघात झालेल्या अटीतटीच्या लढाईत राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचे उमेदवार आणि विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचा पराभव झाला. या मतदारसंघातून राष्ट्रवादी ( शरद पवार) पक्षाचे उमेदवार बापू पठारे विजयी झाले आहेत. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून वडगाव शेरी मतदारसंघतातून विद्यमान आमदार सुनील टिंगरे आघाडीवर होते. पंधरा हजारांचे मताधिक्य मिळवित टिंगरे आघाडीवर असताना अचानकपणे बापू पठारे यांनी त्यांचे मताधिक्य तोडून आघाडी घेतली. या मतदारसंघातून बहुजन समाज पक्षाकडून हुलगेश चलवादी निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. या मतदारसंघात लागलेला निकाल धक्कादायक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

५० हजारांहून अधिकची हक्काची मतं असून देखील तेवढीही मतं न मिळाल्याने ईव्हीएम यंत्रणेत घोळ असल्याचा आरोप वडगाव शेरी मतदार संघातील बहुजन समाज पक्षाचे उमेदवार डॉ.हुलगेश चलवादी यांनी केला. ईव्हीएम यंत्रणेसंबंधी अनेक तक्रारी असून देखील त्यावरच निवडणूकीचे चक्र अवलंबून असल्याने आता याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असून लवकरच जनहित याचिका न्यायालयात दाखल करणार असल्याचे चलवादींनी सांगितले.

हेही वाचा…पर्वतीत नामसाधर्म्यामुळे महाविकास आघाडीच्या अश्विनी कदमांना फटका? दोन अपक्ष अश्विनी कदमांना किती मते जाणून घ्या…

प्रस्थापित पक्षांनी यावेळी मतदार संघात पैशांचे अमाप वाटप केल्याने हा धनबलाचा आणि ईव्हीएमचा कौल आहे; जनमताचा नाही. वडगाव शेरी मतदार संघात जवळपास १५० कोटींचे वाटप झाल्याचा धक्कादायक आरोप देखील त्यांनी यावेळी केला.मतदार संघात दलित, मागासवर्गीय, ओबीसी,अल्पसंख्याक मतदारांची मोठी संख्या आहे. ही सर्व मतदार बहुजन समाज पक्षांच्या बाजूने कौल देतात. यंदा मतदारसंघात बसपाचे वारे होते. विविध वस्त्यांमध्ये, सोसायटी,परिसरात बसपचीच चर्चा होती.

हेही वाचा…वडगावशेरीत चुरशीची परंपरा कायम- शहरात ‘तुतारी’ वाजली

चलवादींना मिळाली इतकी मते

मतदारसंघात पहिल्या तीन उमेदवारांमध्ये डॉ.चलवादींची चर्चा होती. असे असतांना त्यांना केवळ ३ हजार ७६२ मतं मिळाली आहे. यावर चलवादी यांनी नाराजी व्यक्त केली असून ईव्हीएम यंत्रणेत घोळ झाल्याचा संशय डॉ.चलवादी यांनी व्यक्त केला आहे. वडागाव शेरी मतदार संघातील सर्व जनता ठामपणे पाठिशी उभी असतांना देखील प्रत्यक्षात मिळालेली मतं बघता हा निकाल जनतेचा नाही, तर भ्रष्ट ईव्हीएमचा असल्याचा दावा त्यांनी केला. यामुळे मतपत्रावर निवडणूक होणे आवश्यक आहे. जेणेकरून मतदारांचे खर मत कुणाला हे कळत.आता ईव्हीएम विरोधात अधिक तीव्र आंदोलन उभारू असे,डॉ.चलवादी म्हणाले.