पुणे : पुणे-नगर रस्त्यावर होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी खराडी-शिवणे हा नदीपात्रातील प्रलंबित रस्ता तातडीने पूर्ण करण्याची मागणी वडगाव शेरीचे नवनिर्वाचित आमदार बापूसाहेब पठारे यांनी केली.

आमदार पठारे यांनी महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेत वडगाव शेरी मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत चर्चा केली. शहर अभियंता प्रशांत वाघमारे, पथ विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

Person murder, Dead Body , Dog ,
नागपूर : श्वानाची स्वामीनिष्ठा; जंगलात मालकाचा खून झाला अन्…
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
ahilyanagar police
अहिल्यानगर : पोलीस बळाचा वापर करत महापालिकेने अतिक्रमणे हटवली
Due to increasing urbanization 36th police station in nagpur is located in Garoba Maidan area
उपराजधानीत ३६ वे पोलीस ठाणे, वाढत्या शहरीकरणामुळे गरोबा मैदान परिसरात…
Two people die after being shot by colleague as mistaking them for animals
प्राणी समजून गोळी झाडल्याने दोघांचा मृत्यू? गावठी कट्ट्यांच्याद्वारे शिकारी दरम्यानची घटना
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
Nagpur, palm trees, ashoka trees ,
नागपूर : वर्दळीच्या रस्त्यावरील १५० पाम, ४१० अशोकाची झाडे तोडली
Commissioner orders surgical strike on encroachments to break traffic jam
कोंडी फोडण्यासाठी आयुक्त रस्त्यावर, अतिक्रमणांवर ‘सर्जिकल स्ट्राईक’चे आदेश

हेही वाचा…बंद होणारी स्मार्ट सिटी सुरु राहणार, नक्की काय आहे प्रकार!‘एटीएमएस’ यंत्रणेची जबाबदारी घेण्याची ‘स्मार्ट सिटी’ची तयारी; महापालिकेला पाठविले पत्र

वडगाव शेरी मतदारसंघाची लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. त्यामुळे वाहनांची संख्या, वाहतूक कोंडी देखील वाढली आहे. पुणे-नगर रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून नदीपात्रातून प्रस्तावित असलेल्या शिवणे-खराडी रस्त्याचे रखडलेले काम पूर्ण होणे गरजेचे आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. त्यामुळे पालिकेने प्राधान्यक्रमाणे या रस्त्याच्या कामातील अडचणी दूर करून हा रस्ता पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी पठारे यांनी केली.

गेल्या १० वर्षांत या रस्त्याच्या कामाकडे झालेले दुर्लक्ष यामुळे हे काम रखडले आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होतो. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर वाहतूक कोंडी कमी होणार आहे. पालिका प्रशासनाने देखील हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही दिली असल्याचे आमदार पठारे यांनी सांगितले.

हेही वाचा…नव्या वर्षात पुन्हा निवडणुका… मतदारयाद्यांची तयारीही सुरू

शिवणे ते खराडी हा रस्ता नदीपात्रातून करण्यात येणार आहे. हा रस्ता पूर्णत्वास गेल्यानंतर वाहन चालकांचा त्रास कमी होणार आहे. कमी वेळेत नागरिकांना नगर रोडवर जाणार मदत होणार आहे. या रस्त्यामध्ये खाजगी जागा मालकांच्या जमिनी जात असल्याने हे काम रखडले आहे. महापालिका प्रशासनाने या जमिनी ताब्यात घेऊन तातडीने हा रस्ता पूर्ण करावा अशी मागणी होत आहे.

Story img Loader