जिभेचे चोचले पुरवण्यासाठी किंवा कोणाला भेटण्यासाठी अगदी सहज एखादे हॉटेल ठरवले जाते. यामध्ये तरुणाईचा सहभाग सर्वात जास्त असल्याचे दिसते. पुण्यातील हॉटेल्ससाठी प्रसिद्ध असणाऱ्या फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील अतिशय नामांकित अशा हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असल्याचे नुकतचे समोर आले आहे. अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) दिलेल्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. वैशाली, रुपाली आणि कॅफे गुडलक यांसारखी हँगआऊटसाठी प्रसिद्ध असलेल्या हॉटेल्सचा या यादीत समावेश आहे. या हॉटेलचे भटारखाने अतिशय गलिच्छ असल्याचे एफडीएने दिलेल्या अहवालात म्हटले आहे.

हॉटेलच्या स्वच्छतेबाबत एफडीएचे काही निकष असतात. हे निकष हॉटेल्सकडून पाळण्यात येतात का याची पाहणी करण्यासाठी एफडीएने अचानक पाहणी केली असता याठिकाणी अस्वच्छता असल्याचे समोर आले आहे. यामध्ये सिझलर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या याना सिझलर्सचाही समावेश आहे. वैशाली हॉटेलच्या भटारखान्यात मोठ्या प्रमाणात कचरा होता, तसेच याठिकाणी अन्नपदार्थ बनविण्यासाठी वापरण्यात येणारी भांडीही खराब अवस्थेत असल्याचे या पाहणीत समोर आले आहे. आपल्याला चमचमीत पदार्थ बनवून देणारे शेफही स्वच्छतेच्या बाबतीत निष्काळजी असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले होते. रुपाली हॉटेलची स्थितीही अशीच असल्याचे समोर आले.

latiwadi
सांगली साताऱ्याची प्रसिद्ध लाटीवडी! मैदा न टाकता झटपट बनवा पारंपारिक पदार्थ, ‘ही’ घ्या रेसिपी
29th September rashibhavishya in marathi
२९ सप्टेंबर पंचांग: भाग्याची साथ की आर्थिक घडी…
Prashant Chafekar, Vasai, doctor Prashant Chafekar,
वसई : प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत चाफेकर यांचे निधन, कर्करोगाविरोधातील लढा ठरला अपयशी
Tirupati Laddu Revenue in Marathi
Tirupati Laddu Revenue: जनावरांच्या चरबीचा प्रसादात वापर; लाडू विकून तिरुपती मंदिराला किती महसूल मिळतो?
Navi Mumbai is Semiconductor Hub start on the occasion of inauguration of Semiconductor Project
नवी मुंबई सेमीकंडक्टरचे हब, सेमीकंडक्टर प्रकल्प उद्घाटनाच्या निमित्ताने मुहूर्तमेढ
Cursed parking area this puneri pati viral on social media teaching lesion to rekless drivers in puneri style
‘शापित पार्किंग क्षेत्र, विश्वास नसल्यास….!”, नो-पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेकरांचा टोला; पुणेरी पाटी Viral
Puneri Pati
“उगाच पुण्याच्या पाट्या जगभर प्रसिद्ध नाहीत!” नो पार्किंगमध्ये गाडी लावणाऱ्यांना पुणेरी शैलीत टोला, पाहा पुणेरी पाटी
problem of koyta attacks and traffic congestion on the roads in Pune is serious
पेन्शनरांच्या पुण्याचे हे असे काय झाले?

तर मध्य वस्तीतील प्रसिद्ध असणारे कॅफे गुडलक हे इराणी हॉटेलही अतिशय अस्वच्छ असल्याचे समोर आले आहे. याठिकाणच्या स्वयंपाकघरात कोळ्यांची जाळी आणि कचरा आढळला. या अस्वच्छ कारभारामुळे एफडीएने या हॉटेल्सना नोटीस दिली असून एफडीएचे नियम पाळावेत असे सांगण्यात आले आहे. तर एफडीएचे सर्व नियम पाळणे अवघड असल्याचे वैशालीचे मालक शेट्टी यांनी सांगितले. एफडीएने अशाप्रकारे अचानकपणे धाड टाकल्यास अजूनही असंख्य हॉटेल्स अस्वच्छ असल्याचे समोर येण्याची शक्यता आहे. यापुढे एफडीएकडून या हॉटेलवर काय कारवाई होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.