पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांना पाठिंबा देणाऱ्या वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेने महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांना पाठिंबा दिला आहे. तर, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध घडामोडींना वेग आला आहे. रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीला पाठिंबा जाहीर केला. महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे, भाऊसाहेब भोईर उपस्थित होते.

हेही वाचा – पुणे : फर्ग्युसन रस्त्यावर ग्राहकांवरुन दोन दुकानांतील कामगारांमध्ये हाणामारी; कामगारांना पोलिसांकडून चोप

आनंदराज आंबेडकर म्हणाले, चिंचवडमधील पोटनिवडणूक संपूर्ण महाराष्ट्राला वेगळी दिशा देणारी निवडणूक आहे. एकीकडे जातीयवादी पक्ष आणि दुसरीकडे सर्वांना सोबत घेऊन जाणारी महाविका आघाडी यांच्यात लढत होत आहे. रिपब्लिकन सेनेतर्फ नाना काटे यांना पाठिंबा देत आहोत. बिनशर्त पाठिंबा देत आहोत. देशातील परिस्थिती भयानक आहे. न्यायव्यस्था, निवडणूक आयोग, सीबीआय या सर्व संस्थांना मॅनेज करून या देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. हा देशाच्या लोकशाहीवर घाला आहे. देशात भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे थांबायला पाहिजे. त्यासाठी महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे.

हेही वाचा – येरवड्यातील बालसुधारगृहातून पसार झालेल्या अल्पवयीन मुलाला पकडले

समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढणे काळाची गरज आहे. प्रकाश आंबेडकर यांनी काय केले यापेक्षा आज देशाला कशाची गरज आहे हे महत्त्वाचे आहे. राजकारणापेक्षा आज देशाची परिस्थिती अतिशय भयावह आहे. सर्व पक्ष एकत्र आले नाहीत. वेगवेगळे लढले. तर, भाजपा पक्ष सर्वांचा शिवसेना केल्याशिवाय राहणार नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे समविचारी पक्षांनी एकत्र येऊन लढणे काळाची गरज आहे. लोकशाही टिकली पाहिजे. आंबेडकरी जनता समजदार असून मतपेटीतून योग्य तो निर्णय घेतील. भविष्यातही राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससोबत जाण्याबाबत चर्चा चालू आहे. भविष्यात सर्वच एकत्र असतील अशी आशा आहे. संविधान वाचवू पाहणारे, समविचारी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असेही आनंदराज आंबेडकर म्हणाले.