पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार माधवी जोशी यांच्या प्रचार खर्चाच्या पहिल्या तपासणीमध्ये तफावत आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांनी ४८ तासांच्या आत हिशेब सादर करण्याबाबत त्यांना नोटीस पाठवली आहे. तसेच दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीकरिता उपलब्ध करून न दिल्याने सहा अपक्ष उमेदवारांनाही नोटीस दिली आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार खर्चाची पहिली तपासणी ३ मे रोजी पार पडली. त्यानुसार उमेदवाराकडे असलेल्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवहीत आणि निवडणूक विभागाकडे असलेल्या शॅडो (रजिस्टरमध्ये) नोंदवहीत तफावत आढळून आली आहे. वंचितच्या उमेदवार माधवी जोशी यांनी ७२ हजार १२५ रुपयांचा खर्च दाखविला आहे. तर, निवडणूक विभागाच्या नोंदवहीत ९३ हजार ३०५ रुपये खर्च झाल्याची नोंद केली आहे.

Vande Bharat passenger finds insects in food, Railways slaps Rs 50000 fine on caterer
वंदे भारत प्रवाशाला अन्नात सापडले किडे, रेल्वेने केटररला ठोठावला ५० हजार रुपयांचा दंड
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
rupee falls 4 paise to close at all time low of 84 43 against us dollar
रुपया ८४.४३ च्या गाळात!
Biggest Stock Market Crashes in India
मंदीच्या सावटाने बाजार गडगडला! अवघ्या दीड महिन्यात सेन्सेक्समध्ये ८,२८७ ने घट
the survey team of the administration seized gold worth 35 lakhs In Ratnagiri
रत्नागिरीत प्रशासनाच्या सर्वेक्षण पथकाने ३५ लाखांचे सोने पकडले
Details of election expenses of candidates in Nagpur
उमेदवारांचा खर्च : काहींची काटकसर, काहींचा मोकळा हात

हेही वाचा >>> ‘एमआयएम’ची पुण्यातील ताकद दिसणार; ७ मे रोजी असदुद्दीन ओवेसी घेणार सभा

जोशी यांच्या हिशेबात २१ हजार १८० रुपयांची तफावत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जोशी यांना नोटीस बजावली असून ४८ तासांच्या आत म्हणणे सादर करण्याचे आदेश दिले आहेत. मुदतीमध्ये म्हणणे न दिल्यास खर्च मान्य असल्याचे गृहीत धरून त्यांच्या निवडणूक खर्चात समाविष्ट केला जाणार आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार शिवाजी जाधव, सुहास राणे, इंद्रजित गोंड, इकबाल नावडेकर, सदाशिव अढाळगे, अजय लोंढे या उमेदवारांनी दैनंदिन खर्चाचे लेखे तपासणीसाठी दिले नाहीत. त्यामुळे त्यांना नोटीस देत ४८ तासांच्या आत खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे. दुसऱ्या तपासणीवेळी खर्चाचे लेखे तपासणीसाठी द्यावे. अन्यथा वाहने, सभांसाठी देण्यात आलेल्या परवानग्या रद्द करण्याचा इशारा दिला आहे.