लोकसत्ता प्रतिनिधी
पुणे: उपाहारगृहात सुरू असलेला कव्वालीचा कार्यक्रम बंद केल्याने टोळक्याने उपहारगृहातील साहित्याची तोडफोड केली. टोळक्याला समजावून सांगणाऱ्या उपाहारगृहाच्या मालकासह अंगरक्षकांना टोळक्याने मारहाण केली. या प्रकरणी मुंढवा पोलिसांनी टोळक्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी सुमित चौधरी, संकेत सावंत, प्रफुल्ल गोरे, अजय मोरे, फिरोज शेख, अण्णा भंडारी, निखील वंजारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबात निखील मेदनकर (वय ३२ रा. वाघोली ) यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मुंढव्यातील वॉटर्स बार अँड किचनमध्ये कव्वाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मध्यरात्री दीडनंतरही कव्वालीचा कार्यक्रम सुरु होता. त्यामुळे कव्वाली कार्यक्रमाचे संयोजक (इव्हेंट मॅनेजर) निखिल यांनी कार्यक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा-सप्तश्रृंग गडावर चार दिवसाआड पाणी पुरवठा, महिलांची पावसाळ्यातही पाण्यासाठी भटकंती
कार्यक्रम बंद केल्याने आरोपी चिडले. त्यांनी साथीदारांना बोलावून घेतले. टोळक्याने उपाहारगृहात गोंधळ घालून साहित्याची तोडफोड केली. उपाहारगृहाचे मालक तसेच अंगरक्षकांना मारहाण केली. सहायक पोलीस निरीक्षक आर. व्ही. महानोर तपास करत आहेत.