पुणे: कामावरुन काढल्याने पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तोडफोड करण्याची घटना हडपसर भागात घडली. याप्रकरणी एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

अकबर हुसेन तांबाेळी (वय ४२, रा. मंतरवाडी चौक, सासवड रस्ता) असे गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. पेट्रोल पंपमालक यशपाल नागोरी (वय ३७, रा. कल्याणीनगर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नागोरी यांचा सासवड रस्त्यावरील ऊरळी देवाची परिसरात कियांच पेट्रोल पंप आहे. आरोपी तांबोळी पेट्रोल पंपावर काम करत होता. त्याची वर्तणूक चांगली नसल्याने त्याला कामावरुन काढून टाकण्यात आले होते. कामावरुन काढल्याने तांबोळी चिडला होता.

Pune Municipal Corporation construction department issued notices to 125 construction projects in the city and stopped work Pune print news
पुणे: बांधकाम बंद ठेवण्याच्या नोटिशींचा ‘फार्स’ ?
Sharmistha Mukherjee with her father Pranab Mukherjee
Sharmistha Mukherjee: ‘बाबांच्या निधनानंतर काँग्रेसने साधी शोकसभाही घेतली…
unauthorized construction, Shri Gopal lal Mandir temple, Mira Road,
मिरा रोड येथे मंदिराच्या अनधिकृत बांधकामावर कारवाई
Pune Municipal Corporations sealed 27 properties in 18 days
महापालिकेची कामगिरी १८ दिवसात केल्या २७ मिळकती सील!
ulhasnagar Abandoned vehicles removed from main roads
मुख्य रस्त्यांवरील बेवारस वाहने हटवली, उल्हासनगर महापालिकेची वाहतूक पोलिसांसह संयुक्त कारवाई
Hinjawadi, Pimpri Chinchwad Municipal Corporation ,
पिंपरी-चिंचवड महापालिकेत आयटीनगरी हिंजवडीसह सात गावांचा समावेश का रखडला?
Zakir Hussain, Zakir Hussain Kasba Peth,
तबल्याचा ठेका अन् रसिकाग्रणी काका!
Dhayari Locality Roads, Pune City Roads Traffic,
पुण्यातील रस्त्याची राष्ट्रपतींनी घेतली दखल! राज्याच्या मुख्य सचिवांना दिल्या सूचना

हेही वाचा… ‘युवा संघर्ष यात्रा नव्या पिढीची दिंडी’; दुर्लक्ष केल्यास सत्ता गमवावी लागेल; पवार यांचा इशारा

तांबोळी पेट्रोल पंपावर गेला. मला कामावरुन का काढले, अशी विचारणा करुन पेट्रोल पंपातील यंत्राची तोडफोड केली. पेट्रोल पंप जाळण्याची धमकी देऊन तांबाेळी पसार झाला. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

Story img Loader