पिंपरी- चिंचवड शहरातील पिंपळे सौदागरमध्ये वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची सांगवी पोलिसांनी धिंड काढत चांगलीच अद्दल घडवली आहे. मध्यरात्री सौदागर परिसरातील १० ते १५ वाहनांची तीन जणांनी सिमेंटचे गट्टू आणि दगडाने तोडफोड केली होती. या प्रकरणी अवघ्या तासातच आरोपींना सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
आणखी वाचा-पुणे: मैत्रिणीला मेसेज पाठवला, तरुणावर कोयत्याने वार
पिंपरी- चिंचवड शहरातील उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौदागर येथे तीन जनांनी वाहनांची तोडफोड केली. ही घटना रात्री उशिरा घडली होती. यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत तीन जणांना अवघ्या काही तासातच बेड्या ठोकल्या. दारूच्या नशेत आरोपींनी दगड आणि सिमेंटच्या गट्टूने काटे पेट्रोल पंप ते गोविंद गार्डन पर्यंत वाहनांची तोडफोड केली. यामुळे उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या पिंपळे सौंदगरमध्ये भीतीचे वातावरण होते. परंतु, अवघ्या काही तासातच आरोपींना बेड्या ठोकून त्यांची सांगवी पोलिसांनी धिंड काढली आहे. आरोपींना घटनास्थळावर नेवून त्यांना नागरिकांच्या समोरच चांगलाच दम दिला.