लोकसत्ता प्रतिनिधी
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
पुणे: महापालिकेच्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना प्रवेशासाठी दहा लाखांची लाच घेताना अटक झाल्यानंतर तोडफोड केल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) कार्यकर्त्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मंगळवार पेठेतील पारगे चौकात असलेल्या महाविद्यालयाच्या आवारात मनसेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले होते.
याप्रकरणी मनसेचे आशिष साबळे, प्रशांत कनोजिया, धनंजय गवळी यांच्यासह सहा ते सातजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ तांत्रिक भाऊसाहेब माने यांनी याबाबत फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
आणखी वाचा-महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी आज पुण्यात देणार संभाजी भिडेंविरुद्ध पोलिसांकडे तक्रार
वैद्यकीय शाखेत प्रवेश देण्यासाठी दहा लाख रुपये लाच घेताना अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठाता डॉ. आशिष श्रीनाथ बंगिनवार ( वय ५४) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी (८ ऑगस्ट) सायंकाळी अटक केली. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते बुधवारी (९ ऑगस्ट) दुपारी वैद्यकीय रुग्णालयाच्या आवारात जमले. कार्यकर्त्यांनी अधिष्ठाता डॉ. बंगिनवार यांच्या निषेधार्थ घोषणा देऊन कक्षाची तोडफोड केली. मनसेच्या कार्यकर्त्यांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कार्यालयातील तीन संगणक, खुर्च्यांची तोडफोड केली होती. त्यानंतर याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपनिरीक्षक माने तपास करत आहेत.