पुणे : शेजाऱ्यांनी टोमणे मारल्याने दहशत माजविण्यासाठी अल्पवयीनाने मद्याच्या नशेत दहा ते बारा वाहनांची तोडफाेड केल्याची घटना गुलटेकडीतील महर्षीनगर परिसरात पहाटे घडली. याप्रकरणी स्वारगेट पोलिसांनी अल्पवयीनाला ताब्यात घेतले आहे. काम करत नसल्याने शेजाऱ्यांनी टोमणे मारले. रागातून वाहनांची तोडफोड केल्याची कबुली मुलाने पोलिसांना दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुलटेकडीतील महर्षीनगर भागात असलेल्या क्रिसेंट हायस्कूलसमोर दहा ते बारा वाहने लावण्यात आली होती. अल्पवयीन मुलाने पहाटे दहा ते बारा वाहनांची तोडफोड केली. बुधवारी पहाटे ही घटना घडली. टेम्पो, दुचाकी, वाहनांच्या काचा फोडल्याचा आवाज आल्याने रहिवासी पहाटे झाेपेतून जागे झाले. त्यांनी तेथे धाव घेतली. त्यावेळी मुलगा दांडक्याने तोडफोड करत असल्याचे दिसून आले.

हेही वाचा – आंतरधर्मिय विवाह मान्य नसल्याने मोशीत तरुणाचा खून, मृतदेह जाळून हाडे, राख नदीत फेकली

हेही वाचा – तळेगांव दाभाडे येथील मुख्याधिकारी यांच्या कारकिर्दीतील कारभाराच्या चौकशीसाठी समिती, मंत्री उदय सामंत यांची माहिती

नागरिकांनी या घटनेची माहिती पाेलीस नियंत्रण कक्षाला दिली. स्वारगेट पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन अल्पवयीनाला ताब्यात घेतले. त्याची चौकशी करण्याात आली. अल्पवयीन मुलगा काही कामधंदे करत नाही. काम करत नसल्याने शेजाऱ्यांकडून टोमणे मारण्यात येत होते. राग आल्याने मंगळवारी रात्री त्याने मद्यपान केले. त्यानंतर त्याने पहाटे वाहनांची तोडफोड केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vandalism of vehicles by a minor boy under the influence of alcohol an incident in maharshinagar area pune print news rbk 25 ssb
Show comments