पिंपरी- चिंचवड मध्ये वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञात दोन व्यक्तींनी १३ ते १४ वाहनांची तोडफोड केली आहे. तोडफोडीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.यामुळे पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांच मोठं नुकसान झालं आहे. पिंपळे गुरव भागातील मयुरी नगरी परिसरात पहाटे चार वाजता घटना घडलेली आहे. घटनेची माहिती मिळताच सांगवी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, तोंडाला मास्क बांधून आलेल्या दोघांनी दिसेल त्या गाडीला लक्ष करत कोयत्याने वाहनांच्या काचांची तोडफोड केली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा पिंपळे गुरव परिसरात दहशत पसरली आहे. पिंपळे गुरव च्या मयुरी नगरी भागात रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या वाहनांना लक्ष करण्यात आलं आहे. ही घटना आज पहाटे चार च्या सुमारास घडली आहे. घटनेमुळे परिसरात दहशत पसरली आहे. पिंपरी- चिंचवड शहरामध्ये याआधी देखील अनेकदा वाहन तोडफोडच्या घटना घडलेल्या आहेत. परंतु, अशा घटनांमुळे सर्वसामान्य नागरिकांच मोठं नुकसान होत, असल्याचे पाहायला मिळत आहे. सांगवी पोलीस अज्ञात दोघांचा शोध घेत आहेत.