पिंपरी : पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयामध्ये अर्ज केल्याच्या रागातून एकाने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत तेथील नागरिकांना दमदाटी केली. हा प्रकार रविवारी रात्री काळेवाडी येथील पंचनाथ कॉलनीत घडला. आशिष बालाजी पांचाळ (वय २२, रा. पाचपीर चौक, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सदाशिव तुकाराम डिगे (वय ५०, रा. भाटनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – बार्टी, सारथी, महाज्योतीच्या पाठ्यवृत्ती परीक्षेबाबत मोठा निर्णय, होणार काय?

हेही वाचा – देशातील पोल्ट्री उद्योगाला चांगले दिवस ? जाणून घ्या कोणत्या देशांना किती निर्यात झाली

आरोपी याचे नातेवाईक बाळासाहेब सांगोळे हे पंचनाथ कॉलनीतील मंगलदीप अपार्टमेंट येथे राहतात. याच अपार्टमेंटमध्ये फिर्यादीदेखील राहतात. रात्रीच्या वेळी फिर्यादी हे त्यांचे आई-वडील व मित्र यांच्या सोबत पार्किंगमध्ये फेरफटका मारत असताना आरोपी डिगे तेथे आला. त्याच्या पत्नीने घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला असल्याच्या कारणावरून त्याने सोसायटीमध्ये पार्क केलेल्या गाड्या फोडण्यास सुरुवात केली. त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याने फिर्यादी व इतरांना शिवीगाळ करत मारहाण केली. फिर्यादी यांच्या हाताचा चावा घेतला. तसेच, जीवे मारण्याची धमकी दिली.