राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षपदाची जबाबदारी विद्यमान शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्याकडेच कायम ठेवण्यात आली आहे. शहराध्यक्षाच्या नेमणुकीबाबत पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी निर्णय घ्यावा, असे पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत गेल्या पंधरवडय़ात ठरवण्यात आले होते. त्यानुसार पवार यांनी वंदना चव्हाण यांनाच पदावर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

खासदार आणि शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांची शहराध्यक्षपदाची मुदत संपली होती. त्यानंतर शहराध्यक्ष बदला अशी मागणी पक्षातून केली जात होती. अध्यक्षपदासाठी पक्षात अनेकजण इच्छुक होते. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या आदेशानुसार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बठक घेऊन पुण्यातील पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली होती. बैठकीतील चर्चेनंतर शहराध्यक्ष नियुक्तीचे सर्वाधिकार शरद पवार यांना देण्यात आले होते. त्यानुसार महापालिका निवडणुकीपर्यंत शहाराध्यक्षपदी वंदना चव्हाण कायम राहतील असे पवार यांनी सांगितल्याची माहिती महापौर प्रशांत जगताप यांनी शुक्रवारी दिली.

महापालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०१७ मध्ये होत असून या निवडणुकीमुळे शहराध्यक्षपदाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vandana chavan re elected as ncp pune city president