पुणे : केंद्र सरकारने देशभरात ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ रेल्वे गाडय़ा सुरू करण्याचा सपाटा लावला आहे. ही अत्याधुनिक वेगवान गाडी असल्यामुळे प्रवाशांमध्येही तिच्याबद्दल कुतूहल आहे. आता ती आणखी वेगळय़ा रूपात आणि भगव्या रंगात दाखल झाली आहे. अधिक सुरक्षितता आणि तांत्रिक सुधारणा असलेल्या या गाडीची बांधणी चेन्नईतील रेल्वे कारखान्यात सुरू आहे. तेथेच या गाडीची शनिवारी चाचणी घेण्यात आली.

रेल्वे मंडळाने दिलेल्या उद्दिष्टानुसार गेल्या वर्षांपासून चेन्नईतील प्रकल्पात दोन हजार ७०२ रेल्वे डब्यांची निर्मिती करण्यात आली आहे. चालू वर्षांत या प्रकल्पातून ३० प्रकारच्या तीन हजार २४१ डब्यांच्या निर्मितीचे उद्दिष्ट असून, त्यात नव्या स्वरूपाच्या वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. याच वर्षी वंदे भारत गाडय़ांचे ‘वंदे मेट्रो’ रूप सादर केले जाणार आहे. ही गाडी शहरांतर्गत जवळच्या अंतरासाठी वापरण्यात येईल. गाडीत सहजपणे चढता आणि उतरता यावे, यासाठी तिला समांतरपणे दोन्ही बाजूला उघडणारे दरवाजे असतील.

Pune ranks fourth in the world in slow traffic Pune print news
मंद वाहतुकीत पुणे जगात चौथे
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
Mercedes Benz India sales news in marathi
भारतात गाड्यांच्या विक्रीत दोन लाखांचा टप्पा; मर्सिडीज बेंझचा ‘आलिशान’ वरचष्मा कायम 
gadchiroli potholes on national highway
राष्ट्रीय महामार्गांच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह, मुख्यमंत्र्यांचे गडचिरोलीला ‘स्टील सिटी’ बनवण्याचे…
Sleeper Vande Bharat Express , Sleeper Vande Bharat,
नागपूर, पुणे, मुंबईकरिता स्लीपर वंदे भारत एक्स्प्रेस
Hyundai Creta EV feature make tea or cofee charge gadgets in this car with v2l feature
आता चहा आणि कॉफीसाठी कारमधून उतरायची गरज नाही! Hyundai Creta EV मध्ये मिळणार जबरदस्त फीचर
Badlapur, chemical sewage channel, underground sewerage scheme, old channel, sewage Badlapur, l
बदलापूर : रासायनिक सांडपाणी वाहिनीचा प्रश्न सुटणार! १२८ कोटींच्या भुयारी गटार योजनेला सुरुवात, जुनी वाहिनी बदलणार
Focus on making 15 major roads in the city congested pune news
गतिमान वाहतुकीचा संकल्प; शहरातील प्रमुख १५ रस्ते कोंडीमुक्त करण्यावर भर

जम्मू आणि काश्मीर भागात तापमान गोठणिबदूजवळ असते. त्यामुळे तेथे चालविल्या जाणाऱ्या वंदे भारत गाडय़ांच्या डब्यात उष्ण तापमान करण्याची सुविधा आणि जलवाहिनी गोठू नये, अशी यंत्रणा विकसित केली जात आहे. पुढील वर्षी ही गाडी तयार होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर मालवाहतूक अधिक गतिमान करण्यासाठी गतिशक्ती गाडय़ा विकसित केल्या जात आहेत. ई-कॉमर्ससह जलद वाहतूक गरजेची असणाऱ्या वस्तूंसाठी या गाडय़ा महत्त्वाच्या ठरणार आहेत.

लवकरच स्लीपरचीही सोय : लांब पल्ल्याचा प्रवास करताना प्रवासी शयनयान (स्लीपर) सुविधा असलेल्या रेल्वे गाडय़ांना प्राधान्य देतात. सध्या वंदे भारत गाडय़ांमध्ये अशी सुविधा नाही. त्यामुळे स्लीपर सुविधा असलेल्या वंदे भारत गाडय़ांची निर्मिती करण्याचे नियोजन सुरू आहे. या वर्षांच्या अखेपर्यंत त्यावर शिक्कामोर्तब होईल.

नवे स्वरूप

  • भगवा आणि करडा रंग. आसने अधिक आरामदायी
  • मोबाइल चार्जिगसाठी अधिक चांगली सुविधा
  • एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये पाय ठेवण्यासाठी मोठी जागा
  • जास्त खोलीची वॉश बेसिन. स्वच्छतागृहात नवी प्रकाश योजना
  • वाचनासाठीचा दिवा अधिक प्रवासीस्नेही

Story img Loader