Vanraj Andekar Murder in Pune : पुण्याला विद्येचं माहेरघर म्हटलं जातं. मात्र गेल्या काही दिवसांपासून या ठिकाणी गुन्हेगारीच वाढली आहे. पुण्यातल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडून आणि कोयत्याचे वार करुन हत्या करण्यात आली. या घटनेचा थरार आता सीसीटीव्हीमुळे समोर आला आहे. वनराज आंदेकर ( Vanraj Andekar ) उभे असताना अचानक जमाव आला आणि त्यांच्यावर वार केले. यानंतर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वनराज आंदेकर ( Vanraj Andekar ) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण तिथे त्यांची प्राणज्योत मालवली.

पोलिसांनी काय सांगितलं?

वनराज आंदेकर ( Vanraj Andekar) रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम परिसरात थांबले होते. त्या वेळी त्यांच्यावर हल्लेखोरांनी पिस्तुलातून पाच ते सहा गोळ्या झाडल्या. तसेच, कोयत्याने वार केले. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती गुन्हे शाखेचे उपायुक्त निखिल पिंगळे यांनी दिली.

Vanraj Andekar Shot Dead in Pune News| Pune Crime News Vanraj Andeka Attack
Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर…
Lalbaug Accident News
Lalbaug Accident : मद्यधुंद प्रवाशामुळे नुपूर मणियारचा मृत्यू, लालबागच्या अपघातात कुटुंबाने कर्ती लेक गमावली
Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
Former NCP corporator Vanraj Andekar,
पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकरांवर गोळीबार; उपचारांदरम्यान मृत्यू
Maharashtra News Live Update in Marathi
Maharashtra News : “आता सगळेच पवार घरोघरी फिरायला लागलेत”, अजित पवारांची बारामतीतून खोचक टीका
Narendra modi on Surat Loot
Surat Loot : सूरतेची महाराजांची लूट आणि मोदींचे १० वर्षांपूर्वीचे उद्गार… नक्की ऐका

फुटेजमध्ये काय दिसतं आहे?

नाना पेठेत वनराज आंदेकर (Vanraj Anderkar) आणि त्यांच्यासोबत एक जण उभे होते. यावेळी जवळपास सात दुचाकीवरुन जवळपास १४ ते १५ जण येतात आणि वनराज आंदेकर यांच्या अंगावर धावून जातात. यावेळी हल्लेखोरांच्या हातामध्ये बंदुका आणि कोयता असल्याचं सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येतंय. वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करुन सर्व घटनास्थळावरुन पळ काढतात.

पोलीस सह आयुक्त रंंजनकुमार शर्मा काय म्हणाले?

पुण्याचे पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितलं की, रविवारी संध्याकाळी (१ सप्टेंबर) साडेनऊ वाजता दोन जण नाना पेठेतील परिसरात उभे होते. यावेळी काही अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला, त्यात वनराज आंदेकर यांचा मृत्यू झाला आहे. वनराज आंदेकर यांचा मृतदेह ससून रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. त्यांच्यावर पाच राऊंड फायर करण्यात आले आणि तीक्ष्ण हत्यारानं त्यांच्यावर वार करण्यात आले आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हे कृत्य नेमकं कशामुळे केलं आहे, हे अद्याप स्पष्ट आहे. मात्र, या आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत.

हे पण वाचा- Vanraj Andekar Shot Dead : वनराज आंदेकरांवर बहिणीच्या पतीकडून गोळीबार; मालमत्तेच्या वादातून आंदेकरांचा खून

Vanraj Andekar Attack CCTV
वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्यात आला ते सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे.

कोण होते वनराज आंदेकर?

वनराज आंदेकर हे पुणे महापालिकेच्या २०१७ च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमधून नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्या अगोदर वनराज आंदेकर यांच्या मातोश्री राजश्री आंदेकर या २००७ आणि २०१२ या दोन वेळा नगरसेविका होत्या. वनराज आंदेकर यांचे चुलते उदयकांत आंदेकर हेही नगरसेवक होते. त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना ठार करण्यात आलं आहे.