पुणे : माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची हत्या करण्यासाठी तब्बल दीड महिन्यापासून रेकी करण्यात येत असल्याची माहिती उघडकीस आली आहे. गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करुन वनराज यांची हत्या करण्यात आली होती. दीड महिन्यांपासून वनराज यांच्यावर हल्लेखोरांचे लक्ष होते.
वनराज आंदेकर यांच्या हत्येसाठी तीन पिस्तुलांचा वापर करण्यात आला होता.वनराज यांच्यावर हल्ला करण्यासाठी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दूधभाते, जयंत कोमकर यांनी योजना आखली होती. सोमनाथ गायकवाड याने अनिकेत दूधभाते याला या हल्ल्याची माहिती दिली होती. रविवारी दुपारी वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करण्याचे आखण्यात आले होते. रात्री आंदेकर यांच्यावर हल्ला करत त्यांची हत्या करण्यात आली.
अनिकेत दूधभाते याने इतर आरोपींची जुळवाजुळव केली. त्यानंतर त्यांना घेऊन तो नाना पेठेत आला. तेथे वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. तसेच कोयत्याने वार केला. हल्ला केल्यानंतर कुठल्या रस्त्याने पळून जायचे याची देखील आरोपींनी अगोदरच तयारी करून ठेवली होती. आरोपी दुचाकीवरून आले आणि दुचाकीवरूनच पळून गेले. या हत्या प्रकरणात आतापर्यंत १८ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.