लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पुणे : पावसाने उघडीप दिल्याने पुणे विभागातून फळभाज्यांची आवक वाढली. भेंडी, गवार, काकडी वांगी, शेवगा, वालवर, घेवड्याच्या दरात घट झाली. पुणे विभागात पावसाने उघडीप दिल्याने फळभाज्यांची आवक वाढली. अन्य फळभाज्यांचे दर स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी (१८ ऑगस्ट) राज्य, तसेच परराज्यातून मिळून १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेशातून मिळून ८ ते १० टेम्पो हिरवी मिरची, कर्नाटक, गुजरातमधून मिळून प्रत्येकी ८ ते १० टेम्पो कोबी, कर्नाटकातून पावटा आणि घेवडा प्रत्येकी २ ते ३ टेम्पो, आंध्र प्रदेश, तमिळनाडूतून मिळून ४ ते ५ टेम्पो शेवगा, मध्य प्रदेशातील इंदूर भागातून ८ ते १० टेम्पो गाजर, गुजरातमधून १ टेम्पो भुईमूग शेंग, मध्य प्रदेशातून १० टेम्पो लसूण अशी आवक परराज्यातून झाली, अशी माहिती मार्केट यार्डातील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.

आणखी वाचा-विमानतळावर महिला प्रवाशाकडून जवान महिलेच्या हाताचा चावा, महिला जवानाला धक्काबुक्की प्रकरणात गुन्हा

पुणे विभागातून सातारी आले ७०० ते ८०० गोणी, भेंडी ७ ते १० टेम्पो, गवार ५ ते ६ टेम्पो, टोमॅटो ९ ते १० हजार पेटी, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, पुरंदर, पारनेर, वाई, सातारा परिसरातून मटार ८ ते १० टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कोबी ५ ते ६ टेम्पो, फ्लाॅवर १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंग ६० गोणी, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, कांदा ७० ते ८० ट्रक, तसेच इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून ४५ ते ५० टेम्पो बटाट्याची आवक झाली.

कोथिंबिर, मेथीच्या दरात अल्पशी वाढ

मागणी वाढल्याने कोथिंबिर, मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिना, चुका या पालेभाज्यांच्या दरात अल्पशी वाढ झाली. करडई, अंबाडी, मुळे, राजगिरा, चवळई, पालकचे दर स्थिर आहेत. तरकारी विभागात रविवारी कोथिंबीर एक लाख जुडी, मेथीच्या ७० हजार जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली. घाऊक बाजारात शेकडा पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे – कोथिंबीर – १२०० ते २००० रुपये, मेथी – ८०० ते १२०० रुपये, शेपू – ८०० ते १२०० रुपये, कांदापात – ८०० ते १५०० रुपये, चाकवत – ४०० ते ८०० रुपये, करडई – ३०० ते ७०० रुपये, पुदिना – ५०० ते १००० रुपये, अंबाडी – ४०० ते ७०० रुपये, मुळे – ८०० ते १५०० रुपये, राजगिरा – ४०० ते ७०० रुपये, चुका – ५०० ते १००० रुपये, चवळई – ४०० ते ७०० रुपये, पालक – ८०० ते १५०० रुपये.

आणखी वाचा-अभियांत्रिकी प्रवेशात विद्यार्थ्यांची कोणत्या अभ्यासक्रमाला सर्वाधिक पसंती?

लिंबू, पपईच्या दरात वाढ

फळबाजारात पपई, लिंबांच्या दरात वाढ झाली. चिकू, पेरुच्या दरात घट झाली असून, अननस, डाळिंब, मोसंबी, संत्री, कलिंगड, खरबूज, सीताफळाचे दर स्थिर असल्याची मााहिती व्यापाऱ्यांनी दिली. फळबाजारात रविवारी मोसंबी ७० ते ८० टन, संत्री २ ते ४ टन, डाळिंब ५० ते ५५ टन, पपई १५ ते २० टेम्पो, लिंबे ७०० ते एक हजार गोणी, कलिंगड ३ ते ४ टेम्पो, खरबूज १ ते २ टेम्पो, चिकू एक हजार खोकी, पेरू ८०० ते एक हजार प्लास्टिक जाळी (क्रेट). सीताफळ २० ते २५ टन, अशी आवक झाली.