पुणे : ‘आता आपले खासदार होणार चारशे चार, कारण इंडि्याच्या नावाने बोगस काम करणाऱ्यांवर मी करणार आहे वार’, अशा काव्यमय शब्दांत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शुक्रवारी आत्मविश्वास व्यक्त केला. ‘माय होम इंडिया संस्थेतर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या १२३ व्या जयंतीनिमित्त विविध कला साधकांना आठवले यांच्या हस्ते लता मंगेशकर स्मृती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यावेळी आठवले बोलत होते.  प्रसिद्ध पार्श्वगायक सुदेश भोसले, माय होम इंडिया संस्थेचे सुनील देवधर या वेळी उपस्थित होते. शर्वरी जमेनीस, सावनी शेंडे, सौरभ काडगावकर, आनंद देशमुख, मंदार परळीकर, श्रद्धा गायकवाड, हेमराज मावळे, श्रीपाद ब्रह्मे यांच्यासह १७ जणांचा या वेळी सन्मान करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> १०१ कोटींसाठी अजित पवार गेले अमित शहांच्या दरबारी!…

पूर्वांचलामध्ये रामदास आठवले यांचे बरेच चाहते आहेत, या देवधर यांच्या वक्तव्यासंदर्भात आठवले म्हणाले, माझा पक्ष छोटा आहे. मात्र, छोटे पक्षच मोठे होत असतात. भाजपही लहान पक्ष होता. देशात केवळ दोन खासदार होते. मात्र, आता भाजप सर्वात मोठा पक्ष झाला आहे. माझ्या पक्षाचा एकही खासदार नसताना मी केंद्रीय मंत्री आहे. मंत्रीपद जाईल याची अनेक केंद्रीय मंत्र्यांना भिती वाटते. मात्र, माझ्या मंत्रीपदाला धोका नाही. ‘माझ्या मंत्रीपदाला नाही धक्का कारण मी आहे विचारांनी पक्का’, अशी टिप्पणी त्यांनी केली. जगाच्या विविध देशांमध्ये भारतीय मोठ्या संख्येने आहेत. त्रिनिदाद दौऱ्यावर असताना तेथे टॅक्सीमध्ये मला लता मंगेशकर यांची गाणी ऐकायला मिळाली. चौकशी केल्यानंतर बिहारमधील सव्वाशे कुटुंबे तेथे स्थायिक झाली असल्याचे समजले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Various art seekers honored with lata mangeshkar memorial award by ramdas athawale pune print news vvk 10 zws