पुणे : कसबा आणि चिंचवडच्या दिवंगत आमदारांच्या निधनानंतर तातडीने पोटनिवडणूक जाहीर करणाऱ्या शिंदे-फडणवीस सरकारची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते वसंत मोरे यांनी स्पष्ट शब्दात कानउघडणी केली आहे. तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्याठिकाणी निवडणुका घेतल्या, मग मागील एक वर्षापासून शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत, असे सांगत वसंत मोरे यांनी महापालिका निवडणुका कधी घेणार? अशी विचारणा केली आहे. त्यासंदर्भातील समाजमाध्यमातूनच त्यांनी पोस्ट करत सरकारची पोटनिवडणुकीवरून कानउघडणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा – पुणे : बंडखोरी रोखण्यात काँग्रेस यशस्वी; बाळासाहेब दाभेकर यांच्याकडून उमेदवारी अर्ज मागे

हेही वाचा – कसब्यात काँग्रेसला बंडखोरी टाळण्यात यश, चिंचवडमध्ये तसं होऊ शकतं का? अजित पवार म्हणाले..

माझा शिंदे-फडणवीस सरकारला एक प्रश्न आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील भाजपाच्या दोन आमदारांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या सरणाची राख अजून निवली सुद्धा नाही, तर तुम्ही तुमची मते कमी होतील म्हणून लगेच त्या-त्या ठिकाणी निवडणुका घेतल्या. मागील एक वर्षापासून आमच्या शहराला कोणताही लोकप्रतिनिधी (नगरसेवक) नाही. प्रशासनाने शहराचे वाटोळे लावले आहे. विकास कामे ठप्प झाली आहेत. निधी नसल्यामळे नागरिकांना चेहरा दाखवावा वाटत नाही. पुण्यातील आमदार खासदारांनी जरा आमच्या चपलेत पाय घालून पहावे आणि हो, जर कोणत्या पक्षाला सहनुभूती मिळेल म्हणून जर निवडणुका टाळत असाल तर तुमचा पराभव निश्चित समजा कारण, जो मनातून हरतो तो रणात काय जिंकणार, असे वसंत मोरे यांनी म्हटले आहे.