पुणे : पुणे लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीचे मुरलीधर मोहोळ,महाविकास आघाडीचे रविंद्र धंगेकर आणि वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे हे तीन उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उभे आहेत. त्यामुळे ही निवडणुक तिरंगी होणार हे जवळपास निश्चित झाले आहे. या तीनही उमेदवाराचा प्रचार देखील सुरू झाला आहे. तर या प्रचारा दरम्यान पुणे लोकसभा निवडणुकीत देखील कसबा पॅटर्न चालणार आणि मीच जिंकणार असे विधान महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या विधानाबाबत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार यांना विचारले असता त्या प्रश्नावर ते म्हणाले की,ही निवडणुक लोकसभेची आहे.त्यामुळे या निवडणुकीत कसबा पॅटर्नपेक्षा विकासाचा कात्रज पॅटर्न पुण्यात चालणार,अशी भूमिका मांडत वसंत मोरे यांना रविंद्र धंगेकर यांना टोला लगावला.

हेही वाचा…नाशिकच्या जागेचा उमेदवार अद्यापपर्यंत जाहीर झालेला नाही : नीलम गोऱ्हे

तसेच ते पुढे म्हणाले की,मला पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून उमेदवारी जाहीर झाल्यापासून ठिकठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे मला एक विश्वास आहे की,वंचित बहुजन आघाडीचा पुण्याचा खासदार वसंत मोरे असणार आहे.पण दुसर्‍या बाजूला आज प्रत्येक जागेसाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना घासाघीस करावे लागत आहे.त्यामुळे त्यांनी ४०० पार चा नारा विसरावा आणि त्या ४०० मधील पुण्याची एक जागा कमी झाली असे भाजपच्या नेत्यांनी आताच समजावे, अशा शब्दात भाजप नेत्यांना त्यांनी टोला लगावला.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more criticise ravindra dhangekar said in pune lok sabha development of katraj pattern will appeal people svk 88 psg