पुणे : मनसेचा राजीनामा दिल्यानंतर लोकसभा निवडणूक लढविणार असल्याची घोषणा करणारे वसंत मोरे महाविकास आघाडीकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक होते. मात्र काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याने त्यांना उमेदवारी मिळण्याच्या आशा धूसर झाल्या असतानाच समाजमाध्यमातून मोरे यांनी सूचक प्रतिक्रिया दिली आहे. ‘तरी पण निवडणूक एकतर्फी कशी होते बघतोच मी’ असे सांगत अपक्ष निवडणूक लढविण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

मनसेच्या स्थापनेपासून कार्यरत असणारे आणि राज ठाकरे यांचे कट्टर समर्थक वसंत मोरे यांनी गेल्या आठवड्यात मनसेचा राजीनामा दिला होता. लोकसभा निवडणूक लढविण्याची जाहीर इच्छा त्यांनी बोलून दाखविली होती. काँग्रेसकडून उमेदवारी मिळावी, यासाठी ते आग्रही होते. त्यासंदर्भात त्यांनी महाविकास आघाडीचे नेते शरद पवार, संजय मोरे यांची भेट घेतली होती. पुण्यातील त्यांचे एकेकाळचे सहकारी, कसब्याचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर आणि प्रभारी शहराध्यक्ष अरविंद शिंदे त्यांच्या भावना समजून घेतली असेही मोरे यांनी म्हटले होते.

हेही वाचा…विद्यापीठ चौकातील कोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना; गणेशखिंड रस्त्यावर अंशत: वाहतूक बदल

महाविकास आघाडीत पुणे लोकसभेची जागा काँग्रेसकडे आहे. त्यानुसार धंगेकर यांचे नाव जवळपास निश्चित झाले आहे. या पार्श्वभूमीवर मोरे यांनी निवडणूक एकतर्फी कशी होते असे विधान समाजमाध्यमातून केले आहे. ‘देखिए जी ये शहर है तुम्हारा, लेकिन इस शहर में दबदबा है हमारा..’ असेही मोरे यांनी म्हटले आहे.