पुणे : वसंत मोरे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, त्यानंतर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत या दोन्ही नेत्यांच्या वसंत मोरे यांनी भेटी घेतल्या आहे. त्यामुळे वसंत मोरे हे कोणत्या पक्षात जाणार आणि त्यांना पुणे लोकसभा निवडणुकीसाठी कोणता पक्ष लढविण्याची संधी देणार, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.पण या सर्व घडामोडी दरम्यान काँग्रेस पक्षाचे कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या कार्यालयात जाऊन वसंत मोरे यांनी भेट घेतली. या दोन्ही नेत्यामध्ये जवळपास अर्धा तास चर्चा झाली. रविंद्र धंगेकर आणि वसंत मोरे हे दोन्ही नेते पुणे लोकसभेसाठी इच्छुक असल्याने, या दोघांच्या भेटीमुळे शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

या भेटीनंतर आमदार रविंद्र धंगेकर म्हणाले की, मागील अनेक वर्षांपासून मी आणि वसंत मोरे राजकीय जीवनात एकत्रित काम करीत आलो आहे. पुणे महापालिकेमध्ये आम्ही दोघांनी राज ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली नगरसेवक म्हणून काम केले आहे. पुणे महापालिकेच्या सभागृहात एकत्रित अनेक वर्ष काम केले. त्या काळात मी विरोधी पक्षनेता होतो. तर त्यांनी गटनेता म्हणून काम केले आहे. त्यामुळे आमच्या दोघांचा स्वभाव एकमेकांना चांगला माहिती आहे. तसेच वसंत मोरे यांना सर्व पक्षाकडून निमंत्रण आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन मी राजकीय जीवनातील मोठ्या भावाच्या नात्याने वसंत मोरे यांच्यापेक्षा दोन चार वर्षांनी मोठा असेल ही बाब लक्षात घेऊन वसंत मोरे यांनी डोकं शांत ठेवून निर्णय घ्यावा, तसेच आपण ज्या जुन्या पक्षात होता. त्या पक्षावर कधीच टीका करू नका असा मैत्रीचा सल्ला दिल्याचे त्यांनी सांगितले.

Swami Govinddev Giri on Vote Jihad
‘निवडणुकीची तुलना धर्म युद्धाशी नको’, व्होट जिहादच्या मुद्द्यावर स्वामी गोविंददेव गिरींनी व्यक्त केलं परखड मत
Daily Horoscope 18 November 2024 in Marathi
१८ नोव्हेंबर पंचांग: संकष्टी चतुर्थी १२ पैकी कोणत्या…
devendra fadnavis campaign bjp candidate mahesh landge
Bhosari Assembly Constituency :मतांसाठी धर्मयुध्द करा; देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
Narendra Modi Kharghar, Narendra Modi latest news,
पंतप्रधानांच्या आगमनाच्या अखेरच्या क्षणापर्यंत सरकारची स्वच्छ खारघर मोहीम सुरूच
Sharad Pawar on Gautam Adani meeting
Sharad Pawar: “होय, बैठक झाली होती, पण…”, NCP-BJP एकत्र येण्यासाठी अदाणींच्या घरी बैठक; अजित पवारांच्या दाव्यावर शरद पवार म्हणाले…
Roads Kharghar, Narendra Modi meeting,
पंतप्रधानांच्या सभेमुळे खारघरचे रस्ते चकाचक
Pakistan Lawyer Demands Shadman Chowk Should Name After Bhagat Singh
लाहोरमधील चौकाला भगत सिंहांचं नाव देण्याची मागणी फेटाळली; दहशतवादी म्हणत केली अवहेलना!
Ajit Pawar group Dilip Walse Patil Politics
Dilip Walse Patil : विधानसभेनंतर राजकीय समीकरणे बदलणार? अजित पवार गटाच्या नेत्याचं सूचक विधान; म्हणाले, “काही गणितं…”

आणखी वाचा- अमली पदार्थ तस्कर ललित पाटीलसह १४ जणांविरुद्ध तीन हजार पानी आरोपपत्र

रविंद्र भाऊंची भेट सहज घेतली : वसंत मोरे

मागील अनेक वर्षांपासून रविंद्र भाऊ हे शहरासाठी काम करीत आहेत. पुणे शहर स्वच्छ,सुंदर आणि सुरक्षित राहिले पाहिजे. हाच माझा आणि त्यांचा हेतू आहे. मी १५ वर्षापासून नगरसेवक आहे.तर रविंद्र भाऊ ३० वर्षापासून नगरसेवक म्हणून काम पाहिले आहे. तसेच मी पहिल्यांदा नगरसेवक झालो. तेव्हा माझा पहिला गुरू रविंद्र भाऊ, त्या काळात रविंद्र भाऊ यांनी पुणे महापालिकेच्या सभागृहात वेळोवेळी भाषण करण्याची संधी दिली. त्यामुळे पुढील राजकीय वाटचालीमध्ये त्याचा फायदा झाला आहे. तसेच आजची भेट अगदी सहज घेतली असून अद्यापपर्यंत कोणताही निर्णय झाला नसल्याचे वसंत मोरे यांनी काँग्रेस पक्षाचे आमदार रविंद्र धंगेकर यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमाशी बोलताना सांगितले.