लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पिंपरी: समाजमाध्यम वापरताना कोणती काळजी घ्यायची, त्यांचे फायदे आणि तोटे काय? एखादी पोस्ट करताना त्याची काळजी कशी घ्यावी, अशा सर्व विषयांचा अभ्यास करूनच विषय समाजमाध्यमावर पोस्ट करावी. समाजमाध्यमामुळे मी आज कुठपर्यंत पोहोचलो आहे. समाजमाध्यमाची ताकद काय आहे, हे आज तुम्हाला माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून लक्षात येईल, असे महाराष्ट्र नवनिर्मान सेनेचे राज्य सरचिटणीस वसंत मोरे यांनी म्हटले आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रभावी मतदार यादी वाचन व मतदार नोंदणी आणि समाज माध्यमाचा प्रभावी वापर या विषयावर आयोजित कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन शिबिर पिंपरी-चिंचवड मध्यवर्ती कार्यालयात पार पडले. शिबिरात राज्य सरचिटणीस तथा पिंपरी-चिंचवड प्रभारी रणजित शिरोळे, बाळा शेडगे, बाबू वागस्कर, शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मनसेचे पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभानिहाय पदाधिकारी व कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

आणखी वाचा-ओडिशातील बालासोर दुर्घटनेनंतर रेल्वेने सुरक्षेबाबत उचलले मोठे पाऊल

समाजमाध्यमात प्रचंड ताकद आहे. एखाद्या विषयाची माहिती घेऊन ती पोस्ट केली तर ती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवता येते. माहितीमधील सत्यता आणि गांभीर्य विचारात घेताना लोकांचे हित आपल्याला कळले पाहिजे. याचा विचार करुन समाज माध्यमातून आपण पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत सहज पोहचवू शकतो. त्याचा वापर प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाने केला पाहिजे. लोकांच्या घरात पोहोचण्यासाठी समाजमाध्यम प्रभावी माध्यम आहे. ते कसे वापरावे याचा अभ्यास करून पोस्ट करता आली पाहिजे. समाजमाध्यम वापरताना कोणती काळजी घ्यायची, त्यांचे फायदे आणि तोटे काय? एखादी पोस्ट करताना त्याची काळजी कशी घ्यावी, अशा सर्व विषयांचा अभ्यास करूनच विषय समाजमाध्यमावर पोस्ट करावी. समाज माध्यमामुळे आज मी कुठपर्यंत पोहोचलो आहे. समाज माध्यमाची ताकद काय आहे, हे आज तुम्हाला माझ्या स्वतःच्या उदाहरणावरून लक्षात येईल, असेही वसंत मोरे यांनी सांगितले. कार्यकर्त्यांच्या प्रत्येक प्रश्‍नांची उत्तरे त्यांनी यावेळी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vasant more told activists about effective use of social media pune print news ggy 03 mrj