पुणे : भोगीसाठी लागणाऱ्या भाज्या खरेदीसाठी शुक्रवारी बाजारात गर्दी झाली. भाज्यांना मागणी वाढल्याने किरकोळ बाजारात दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली. भोगी शनिवारी (१४ जानेवारी) आहे. भोगीसाठी गृहिणींकडून वाल पापडी, पापडी, मटार, वांगी, पावटा, गाजर या भाज्यांना मागणी असते. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

भाज्यांना मागणी चांगली असून मागणी वाढल्याने दरात वाढ झाल्याची माहिती किरकोळ बाजारातील भाजीपाला व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली. भोगीसाठी लागणाऱ्या भाज्यांच्या खरेदीसाठी श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात शुक्रवारी सकाळपासून किरकोळ खरेदीदारांची गर्दी झाली होती.

हेही वाचा >>> पुरंदर विमानतळाच्या उड्डाणाला पुन्हा अडथळा, प्रकल्प अहवालात त्रुटी

मध्यभागातील महात्मा फुले मंडई, नेहरू चौक, गोविंद हलवाई चौक परिसरात भाजीपाला खरेदीसाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. संक्रांतीनिमित्त पूजनासाठी लागणारे साहित्य तसेच तिळगुळाला चांगली मागणी आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी मंडई, शनिपार परिसरात गृहिणींनी गर्दी केली होती. किरकोळ बाजारात पावशेर भाजीचे दर ४० ते ४५ रुपये दरम्यान राहिले. गेल्या आठवड्याच्या तुलनेत भाज्यांच्या दरात वाढ झाली. आवक कमी आणि मागणी वाढल्याने भाज्या कडाडल्या.

हेही वाचा >>> पुणे : तुमच्या अनास्थेमुळे माझ्या फुलराणीचे वाटोळे!, मनसेचे नेते वसंत मोरेंची समाजमाध्यमावर पोस्ट

भोगीनिमित्त गृहिणी मिश्र भाजी तयार करतात. भोगीला भाज्यांना चांगले दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी भाजीपाला राखून ठेवला होता. शुक्रवारी भाज्यांची आवक वाढली. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक कमी झाल्याने भाज्यांच्या दरात गेल्या आठवड्याच्या तुलनेत २० ते २५ टक्क्यांनी वाढ झाली.

– प्रकाश ढमढेरे, भाजीपाला व्यापारी, किरकोळ बाजार

किरकोळ बाजारात भाज्यांचे किलोचे दर

हरभरा गड्डी- २५ रुपये एक गड्डी

वालपापडी- १२० ते १४० रुपये

पापडी- १२० ते १४० रुपये

वांगी- १२० ते १३० रुपये

पावटा- १५० ते १६० रुपये

मटार- ४० रुपये