पिंपरी-चिंचवड शहरांमधील निगडी परिसरात चार वाहने जळून खाक झाली आहेत. ही घटना मध्यरात्री निगडीच्या सेक्टर क्रमांक २२ मध्ये घडली असून सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
आग नेमकी कशामुळे लागली की वाहने पेटवण्यात आली याबाबतचा तपास निगडी पोलीस करत आहेत. आगीत तीन रिक्षा आणि एक वाहन जळून खाक झाले आहे. आग लागताच अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊन आगीवर नियंत्रण मिळवलं, पण तोपर्यंत वाहने जळून खाक झाली होती. वाहन मालकांचे यात मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अधिक तपास निगडी पोलीस करत आहेत.
First published on: 18-06-2023 at 10:05 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vehicle fire in pimpri chinchwad kjp 91 ssb